WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

हिसका मारून मंगळसूत्र लंपास अज्ञान आरोपी विरुद्ध गुन्हा

Image

प्रतिनिधी. सचीन मेश्राम. मारेगांव यवतमाळ

शेतातून घरी परतत असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याचे अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना बोटोणी येथे घडली असून चोरटे मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले.

बोटोणी येथील चंदाबाई दिनकर आत्राम वय 40 वर्षे रा.गोदाम पोड बोटोणी या त्यांच्या ठेक्याने केलेल्या शेतामध्ये तुरीच्या शेंगा तसेच स्वयंपाकासाठी सरपण आणायला गेल्या होत्या. हे सगळे साहित्य घेऊन पांदण रस्त्याने घरी परतत असताना बबन वखणोर यांचे शेताजवळ त्यांचे मागून अज्ञात तिघे जण आले. काही कळायच्या आतच एकाने त्यांच्या तोंडावर रुमाल टाकला व तोंड दाबून धरले , दुसऱ्याने हात पकडून ठेवले आणि तिसऱ्याने गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याचे मणी हिसकावून नेले. ही घटना एवढ्या अकस्मात घडल्याने चंदाबाईच्या काहीच लक्षात आले नाही. चोरांनी सगळं हिसकावल्या नन्तर ते पळून गेले . घटना अचानक घडल्याने घाबरलेल्या चंदाबाई यांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठून घडलेल्या घटनेची माहिती देऊन चोरांना त्वरित पकडण्याची मागणी केली.

बोटोणी येथील महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र हिसकावले

मारेगाव तालुका प्रतिनिधी

या चोरीचा तपास पोलीस निरीक्षक श्री जगदीश मण्डलवार यांचे नेतृत्वाखाली जमादार वेट्टे करीत आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share