WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी येथील विद्यार्थीनीशी असभ्य वर्तन करणारा संशयीत आरोपी उपप्राचार्य फरार.

ImageImage

घटनेच्या अनुषंगाने शिवसेना आंदोलनाच्या तयारीत

-शहर प्रतिनिधी/निलेश चौधरी

यवतमाळ जिल्हा वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात उपप्राचार्य पदावर असलेल्या माणिक राठोड याने महाविद्यालयातील विद्यार्थिनीसी केलेल्या असभ्य वर्तनाने, वणीत तनावपुर्ण वातावरण निर्माण झाले असून संशयित आरोपीला कठोर कारवाईची मागणी समस्त जनतेमधून मोठ्या प्रमाणात होत आहे. महाविद्यालयातील शकडो विद्यार्थी -विद्यार्थीनीने केली असुन त्यांना पाठबळ देण्यासाठी शिवसेनाने दंड थोटपले आहे. नुकताच संशयीत आरोपी उपप्राचार्य फरार असल्याने वणीतील सामाजिक वातावरण तापले आहे. त्याला अटक न केल्यास महाविद्यालयातील संपुर्ण विद्यार्थी पोलीस स्टेशन समोर आंदोलन करणार असा पवित्रा घेतास, महाविद्यालयीन प्रशासनाने उपप्राचार्य माणिक राठोड यांना कायमस्वरूपी कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक खांनजोडे यांनी दिली.अशाप्रकारच्या निर्लज्ज प्राध्यापकाची आमच्या महाविद्यालयाला कुठल्या प्रकारची गरज नाही. असे त्यांनी देशोन्नतीशी बोलताना सांगितले आहे.

माध्यमातून सदर घडलेल्या घटनेचा वृत्त प्रकाशित होताच, विद्यार्थ्यासह सामाजिक संघटना सरसावल्या आहे महिला व विद्यार्थ्यीनीवर होणाऱ्या अत्याचारामुळे देश होरपळत. असताना वणीत नामांकित असलेल्या लोकमान्य टिळक महाविद्यालयात उपप्राचार्याच्या असभ्य अशा कलंकित घटनेने वणी परिसरात एकच खळबळ उडाली असुन, संशयीत नराधम उपप्राचार्य ह्याने यापूर्वी अशीच कृती अनेक वेळा केल्याचे वृत्त मिळालेले आहे. अशा शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या मनोवृत्तीच्या उपप्राचार्याला कठोर शासन करावे अशी मागणी जनते व पालकांमधून होत आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात कुठेही मार्केट पेक्षा कमी दरात सिमेंट उपलब्ध करून देऊ संपर्क - 7218187198

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share