WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी येथील विद्यार्थीनीशी असभ्य वर्तन करणारा उपप्राचार्य अजूनही फरार...

Image

शहर प्रतिनिधी वणी:- निलेश चौधरी

वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयीनात उपप्राचार्य पदावर असलेल्या, माणिक राठोड याने महाविद्यालयीनीनातील विद्यार्थिनीसी केलेल्या असभ्य वर्तनाने ,वणीत तनावपुर्ण वातावरण असुन, संशयित आरोपीला कठोर कारवाईची मागणी ,महाविद्यालयीनीनातील शकडो विद्यार्थी -विद्यार्थीनीने केली.याची तातडीने दखल घेत ,महाविद्यालयीन प्रशासनाने तातडीची सभा बोलावून प्रा. माणिक राठोड याला तडकाफडकी कार्यमुक्त करण्याचे आदेश महाविद्यालयीन प्रशासनाने काढले. प्रा.माणिक राठोड यांची अशी वागणूक खूप वर्षापासून होती .असे तिथले शिक्षक सांगत होते .अशा नराधम प्राध्यापकाला त्वरित अटक करुन , कठोर शासन करावे .म्हणून महाविद्यालयीन शेकडो विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून निवेदन दिले.तीन दिवसापासून फरारी मध्ये असलेला माणिक राठोडचा ,पोलीस युद्धपातळीवर शोध घेत आहे .फरारी मध्ये असताना जर प्रा.माणिक राठोड याला कोणीही ,कुठल्याही प्रकारची मदत केली ,तर मदत करणाऱ्या वर पण गुन्ह्याची नोंद करण्यात येईल .असे ठाणेदार वैभव जाधव यांनी देशोन्नतीला बोलताना सांगितले .आणि जितके जास्त दिवस तो फरार राहीला तितकेच त्याच्या कलमांन मध्ये वाढ होईल .असे सुद्धा ठाणेदार वैभव जाधव यांनी सांगितले .वनी येथील विविध सामाजिक संघटना व महिला सामाजिक कार्यकर्त्या यांनी पोलीस स्टेशन मध्ये येऊन ,आरोपीला तत्काळ अटक करावी म्हणून निषेध नोंदविला ...

त्याच प्रमाने मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड यांनी अशा नराधम प्राध्यापकाला त्वरित अटक करून न्याय देण्याची मागणी केली......

शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा हा निंदनिय प्रकार ,म्हणजे गुरू-शिष्याच्या नात्याला डाग लागणार आहे .

असे सर्व स्तरावर स्तरावरून बोलले जात आहे .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share