WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आणखी एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, आरोपीला तत्काळ अटक

Image

महिलांच्या संबधातीलच व्यक्ती अत्याचारामागचे वास्तव...!! -शहर प्रतिनिधी मारेगाव- तालुक्यातील मांगरुळ येथील एका व्यक्तीने गवातीलच महिलेवर विस्वासात घेउन बाहेर नेले व बळजबरिने अत्याचार केला. दि. १८ डिसेंबर रोजी बुधवारी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास घटना घडली. सदर घटनेची माहिती पतीला मिळाली असता, दुसऱ्या दिवशी मारेगाव पोलिस ठाणे गाठून आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी आरोपीवर फिर्यादिच्या तक्रारीवरून भांदवी ३६३-३७६(१) नुसार गुन्हा नोंदवून आरोपी गणेश धनराज भोयर (वय२५) याला ताब्यात घेतले. शहरातील ही घटना ताजी असताना, वणी- मारेगाव-यवतमाळ मार्गावर असलेले महाविदयालय, मारेगाव येथेही एका विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आला आहे. किशोर अंबादास पिंगे असे अरोपीचे नाव असून तो तेथीलच कला वाणिज्य महाविदयालयात लॅब असिस्टंट असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी पिंगे यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवून मारेगाव पोलिसांनी भांदवी ३५४ (अ) (५) नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल चौधरी करीत आहे. दिवसेंदिवस बलात्काराच्या घटना घडत असून महिलांच्या संबधातीलच व्यक्ती अत्याचार करत असल्याचे वास्तव समोर येत आहे. आता कोणावर विस्वास ठेवायचा असा सवाल पीडिताकडून बोलल्या जात आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share