WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

डॉ. प्रितेश बत्तलवार समाज गौरव पुरस्काराने सन्मानित

Image

वणी :- सुरज चाटे

नागपूर येथे जागतिक मानवाधिकार दिनानिमित्य केंद्रीय मानवाधिकार संघटन नवीदिल्ली द्वारा आयोजित राष्ट्रीय संमेलन व सन्मान समारोह कार्यक्रमाचे आयोजन गुरुदेव सेवामंडळ मंगलकार्यालय, गणेशपेठ येथे करण्यात आले होते. यावेळी डॉ. प्रितेश मल्हारी बत्तलवार यांना मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष्य श्री. मिलिंदजी दहिवळे यांच्या शुभहस्ते "राष्ट्रीय समाजगौरव पुरस्कार" सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. प्रितेश बत्तलवार यांनी सन २००७ पासून आरोग्य समाजसेवा व सन २०१० पासून मानवाधिकार रक्षा च्या क्षेत्रात अथक परिश्रम व समाजसेवा करून आपल्या कार्याचा समाजात ठसा उमटविलेला आहे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून सुद्द्धा त्यांची जनमानसात ओळख आहे. देशप्रेम, धर्मनिरपेक्ष वागणूक, नागरिकांना त्यांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण, सामाजिक बांधिलकी जपणे, शासनाच्या कल्याणकारी योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणे सारखे कार्य जीवनधारा बहुउद्देशीय संस्था व केंद्रीय मानवाधिकार च्या अंतर्गत सल्लामसलत केंद्राच्या माध्यमातून पोलीस स्टेशन व कोर्टात न जाता शेकडो लोकांचे परिवार तुटण्यापासून वाचविले, हजारो विद्यार्थी, गोरगरीब, अपंग, निराश्रित, रुग्ण यांना मोफत सेवा दिली, ६५ वर्षाच्या वरील रुग्नांना आजही ते आपल्या समृद्धी हॉस्पिटल अँड मेडिकेअर मध्ये मोफत तपासणी ची सेवा देत आहेत. या कार्यक्रमाला केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी,विविध राज्यातून मानवाधिकार कार्यकर्ते, सदस्य व मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share