WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ट्रॅक्टरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

Image

रोहपट जवळील घटना.

-शहर प्रतिनिधी/ सचीन मेश्राम

मारेगाव पासून १२ किमी अंतरावर असलेल्या रोहपाट पेंढरी रोडवर ट्रॅक्टरच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाले गुरुवार 19 डिसेंबर रोजी 7 वाजताच्या दरम्यान घटना घडली.

प्राप्त माहिती नुसार सुसरी येथील मधुकर बदु चव्हाण (वय ५०) व रतनलाल ठावरु पवार हे दोघे मारेगाव कडून सुसरी गावाकडे जात असताना रोहपट ते पेंढरी रोड दरम्यान दुचाकी क्र. MH

29 P 3808 ला मागून येणाऱ्या ट्रॅक्टर ने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मारेगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले. मृत्यूदेह तातडीने मारेगाव ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आले. घटनेचा अधिक तपास मारेगाव पोलीस स्टेशनचे पो.नि.जगदीश मंडलवार यांचे मार्गदर्शनाखाली जमा वेटे, गिनगुले व पोलिस ड्रायव्हर राहुल बोंडे तपास करित आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share