WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

महसूल विभागाने जप्त केलेल्या रेती साठ्यावर चोरट्यांचा डल्ला

Image

वणी शहर प्रतिनिधी :- निलेश चौधरी

चार दिवसाआधी महसूल विभागाच्या कार्यवाही मध्ये,25 ब्रास अवैद्य रेती साठा जप्त करण्यात आला होता. त्या रेती साठ्याची चौकशी चालू असतांनाच आज दि.21डीसेंबरला सकाळच्या सुमारास,त्या रेती साठ्यामधुन काही ब्रास रेती चोरीला गेली असल्याची खाञीलायक माहीती हाती आली आहे.याबाबत तहसिलदार धनमने यांच्याकडुन माहिती घेतली असता सदर रेती साठ्यामधुन चोरी गेलेल्या रेतीची चौकशी करनार असल्याचे सांगीतले.

वणी शहरात मोठ्याप्रमाणात मकानांचे बांधकाम सुरु असुन राञीच्या सुमारास अवैद्य रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु असल्याची खाञीलायक माहीती मिळय.तसेच शहरात जागोजागी मोठ्याप्रमाणात रेती साठा उपलब्द असुन,तालुक्यातील काही भागात राञीच्या सुमारास रेती तस्करी सुरु असल्याचीही माहीती हाती आली आहे. याकडे माञ महसुल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share