WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विदर्भ आयडॉल गायन स्पर्धेत विजय चांदेकर पहिला क्रमांक, जूनियर गटात प्रथम सुमेधा बालपांडे

Image

जूनियर प्रथम विजेती कु. सुमेधा बालपांडे, दूसरा क्रं. श्रावणी वरुटकर, क्रं. गौरांग सरमोकदम

अमोल कुमरे

वणी- प्रथमच शहरांमध्ये विदर्भ आयडॉल गायन स्पर्धेचे स्व. पंडित रामगोपाल जोशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ लयतरंग संगीत विद्यालय, ईगल ग्रुप न्यू सितारा म्युझिकल ग्रुप द्वारे ‘स्वरधारा’ विदर्भ आयडॉल गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली. वाणी मारेगाव झरी सह वर्धा चंद्रपुर नागपुर आणि इतर जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. दि. शुक्रवार २० डिसेंबर ला सर्व स्पर्धंकाचे ऑडिशन घेण्यात आले. त्यानंतर निवड झालेल्या स्पर्धकांचे दि. २२ डिसेंबर रोजी वणी येथील शासकीय विदयालय,वणी येथे ‘फायनल स्पर्धा’ लाईव गीत गायन घेण्यात आले. टॉपटेन स्पर्धकातुन सिनिअर गटातून विजय चांदेकर हा प्रथम क्रमांक विदर्भ आयडॉल ठरला. तर जूनियर गटातून प्रथम विजेती कु. सुमेधा बालपांडे (रात अकेली है,चित्रपट जॉनी मेरा नाम), दूसरा क्रं. श्रावणी वरुटकर, वरोरा (कमली कमली चित्रपट धूम३), तीसरा क्रं. गौरांग सरमोकदम, वणी (घेई छंद मकरंद, पं. वसंत देशपांडे) अशा सुरेल विदर्भ आयडॉल गायन गीत गायनाचा अस्वाद वणीकरसह तालुक्यातील जनतेनी घेतला.

या कार्यक्रमाला विशेष प्रमुख उपस्थिती सारेगामापा, सुर नवा ध्यास नवा विजेता अनिरुद्ध जोशी, सामाजिक कार्यकर्त्या किरणजी देरकर, वणी विधानसभेचे माजी आमदार वामनजी कासावार यांच्या उपस्थित हा बहारदार गीत गायन सपन्न झाला. यावेळी विदर्भ आयडॉल गायन स्पर्धेत विजेत्यांचे सौ. किरणजी देरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला सहकार्य लाभलेले प्रशांतजी माधामशेट्टीवार सं. दि यवतमाळ अर्बन बैंक, रविजी साल्पेकर, मंगेशजी गोरंटीवार, अनुजजी मुक्केवार, सचिनजी त्रिवेदी, महेशजी लाल, सुनीलजी तुगनायत, सागरजी बरशेट्टीवार, दिलीपजी भोयर, सिद्धार्थजी खोब्रागडे, देवेन्द्रजी खरबडे, चंदुजी परेकार, जयंतजी कुचनकर, जगदीशजि ठावरी, शैलेशजी आडपावार, अनुपजी कुरेकार, मोरेश्वरजी लांबट, देवेन्द्रजी राजगदकर, रामजी पवार, संजुभाऊ गोडे, विजू भाऊ वासेकर व इतर मान्यवर..संयोजक श्री. राकेशजी बहादडे सर लयतरंग संगीत विदयालय, वणी तसेच कार्यक्रमाला खारीचा वाटा व सहभाग दर्शविणारे संपर्क प्रमुख संतोष जोशी, दिगांबर ठाकरे, अमोल बावने यांनी मोलाची साथ दिली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share