WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मुलांना शिकवू नका, त्यांना स्वतः शिकू द्या. प्रधान सचिव नंदकुमार यांचे व्यक्तव्य

Image

शिक्षकांनी शाळेत विद्यार्थ्यांना शिकविल्यामुळे आपल्या देशातील पाचव्या वर्गातील 50 टक्के मुलांना साधं न अडखळता वाचता येत नाही. 100 टक्के मुलांना लिहता वाचता यायला पाहिजे, जगाचा स्पर्धेत तो टिकला पाहिले असे जर तुम्हाला वाटत असेल तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविणे बंद केले पाहिजे. मुलांना स्वतः शिकू द्या, त्यासाठी नियोजन करा, त्यांना प्रेरित करा. असे आवाहन महाराष्ट्र शासनाचे राजशिष्टचार विभागाचे प्रधान सचिव तथा शिक्षण तज्ज्ञ नंदकुमार साहेब यांनी केले. ते पंचायत समिती शिक्षण विभाग व वेध समूह वणी तर्फे आयोजित 'आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार एक संवाद' या कार्यशाळेत मुख्यमार्गदर्शक म्हणून बोलत होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या कोणत्याही प्रकारच्या मदतीशिवाय व कोणत्याही प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थिती शिवाय आयोजित शिक्षण विभागाचे माजी प्रधान सचिव व सध्याचे राज्याचे राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव पूर्ण वेळ उपस्थित असलेल्या या कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, वणी पंचायत समितीचे उपसभापती संजय पिंपळशेंडे, व्याख्याते निलेश घुगे, बालाजी शेळके, यवतमाळ येथील नीता गावंडे, शिल्पा कोलपल्लीवार योगेश डाफ, वानखेडे व आयोजक गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे उपस्थित होते. या कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका प्रास्ताविकातुन प्रकाश नगराळे यांनी मांडली

मुख्य मार्गदर्शन करतांना नंदकुमार साहेब म्हणाले की, सन 2025 पर्यंत 40 टक्के नोकऱ्या संपणार आहेत. पुढील 30 वर्षानंतर जग कस राहील हे आपण शिकविणाऱ्यांनाही माहीत नाही व शिकणाऱ्या मुलांनाही माहीत नाही. त्यामुळे 30 वर्षानंतर निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याची क्षमता निर्माण होईल अशा प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांना घडवायचे आहे. देशातील 50 टक्के मुले निरुपयोगी होऊ नये यासाठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मुलांना द्यायचे आहे असे आवाहन उपस्थित 200 प्राथमिक शिक्षकांना त्यांनी केले. या प्रसंगी आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार या विषयावर वेध वणी यु- ट्यूब चॅनेल व फेसबुक पेज चे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार हा विषय मांडताना निलेश घुगे म्हणाले की, आज एखादी पदवी किंवा प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळते. आता आपल्याला प्रमाणपत्र नको तर प्रत्यक्ष प्रमाण पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करायचे आहे. शिकायचं कस हे शिकण म्हणजे शिक्षण होय. सतत होणारे बदल नवनवीन तंत्रज्ञान अवगत केल्याने आपण उपयोगी होऊ नाहीतर निरुपयोगी होऊ. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आव्हान स्वीकारून त्याचा उपयोग करायला लावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यावे लागेल. प्रत्येक विद्यार्थ्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे हा त्यांचा हक्क आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षण देण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने स्व पासून केली पाहिजे, त्यामुळे पुढील समस्या आपोआप सुटतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषद शाळा परमडोह येथील कृतिशील शिक्षक निलेश सपाटे यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसह उपस्थित राहून त्यांच्या शाळेतील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. याचे सादरीकरण केले. त्यानंतर स्वप्ना पावडे, अरविंद गांगुलवार, आशा कोवे, वसुधा ढाकणे, हिमा जुनगरी, ज्योती ढाले महादेव धगडी यांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या कार्यशाळेचे सुत्रसंचालन अश्विनी ढेंगळे यांनी केले. आभारप्रदर्शन विजय मेश्राम यांनी केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share