WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

परसोडा येथील तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत

Image

pratinidhiसागर मुने, वणी

वणी तालुक्यातील परसोडा येथील अनु.जाती मुलांची शासकिय निवासी शाळेत दिनांक 23 व 24 डिसेंबर 2029 ला तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान मेळाव्याचे उदघाटन वणी विधानसभा क्षेत्रातील लोकप्रिय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले. अध्यक्षस्थानी वणी पंचायत समितीच्या सभापती लिशाताई विधाते या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे उपसभापती संजय पिंपळशेंडे, दिनकरराव पावडे, जिल्हा परिषद सदस्य बंडुभाऊ चांदेकर, गजानन विधाते, प्रा.महादेव खाडे, गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे, केंद्र प्रमुख लक्ष्मण इड्डे, आयोजक शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी दांडेकर प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी दांडेकर यांनी केले.

उदघाटन पर उद्बोधन करतांना आ.बोदकुरवार म्हणाले की, भविष्यातील बलशाली भारत बनविण्यासाठी बाल वैज्ञानिकांचा पुढाकार महत्वाचा आहे असे त्यांनी सांगितले. उपस्थित अतिथींनी प्रसंगानुरूप उद्बोधन केले. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांचा विज्ञान मेळावा संपन्न झाला. यात मराठी विज्ञान परिषद वणी विभागाचे वतीने विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांसाठी प्रयोगातुन विज्ञान कार्यक्रम संपन्न झाला. यात प्रा.महादेवराव खाडे यांनी विद्यार्थ्यांना हसत खेळत व सप्रयोग मार्गदर्शन केले. त्याशिवाय विविध ऊखाणे व माहितीतुन विद्यार्थ्यांना हसत खेळत मनोरंजक माहिती दिली.

* समारोप व बक्षीस वितरण संपन्न

वणी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ दिनांक 24 डिसेंबरला अनु.जाती मुलांची शासकीय निवासी शाळा परसोडा येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.महादेव खाडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य संघदीप भगत, डॉ. प्रा. विनायक भट, प्रभाकर सुर, राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गजानन कासावार, केंद्रप्रमुख लक्ष्मण ईद्दे, मुख्याध्यापक लक्ष्मीताई दांडेकर हे उपस्थित होते.

या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटातुन 44 तर माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातुन 30 विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रतिकृती सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या या नाविन्यपूर्ण प्रतिकृतीचे परीक्षण करून पुढील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्राथमिक गटातुन प्रथम क्रमांक सफल गजानन भोयर लायन्स ईंग्लिश मिडीअम स्कुल वणी, द्वितीय क्रमांक आयुष गंगाधर गेडाम विवेकानंद विद्यालय वणी, तर तिसरा क्रमांक तेजस मंगेश देवगीरवार जि.प.शाळा मेंढोली तर आदिवासी गटातुन प्रथम क्रमांक रक्षीत खोब्रागडे अनु.जाती मुलांची शासकीय निवासी शाळा परसोडा यांनी बक्षिसे पटकाविले.

माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातुन प्रथम क्रमांक हर्षल दोरखंडे डी ए व्ही पब्लिक स्कुल निलज, व्दितीय क्रमांक अनुमतारा अन्सारी राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालय वणी, तिसरा क्रमांक चेतन अशोक ऊलमाले तुकडोजी महाराज हायस्कूल भालर तर आदिवासी गटातुन प्रथम क्रमांक यश गजानन कांबळे अनु.जाती मुलांची शासकीय निवासी शाळा परसोडा यांनी बक्षीस पटकावले.

शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य मांडणी स्पर्धेत प्राथमिक गटातुन प्रथम क्रमांक ज्योती पंडीतराव ढाले सहा.शिक्षिका जि.प.प्राथमिक शाळा पोहणा, माध्यमिक व ऊच्च माध्यमिक गटातुन पंकज खुशालराव लेदाडे सहा.शिक्षक अनु.जाती मुलांची शासकिय निवासी शाळा परसोडा यांचा गौरव करण्यात आला. प्रयोगशाळा सहाय्यक मधुन झालेल्या प्रदर्शन मधुन प्रथम क्रमांक विलास जाधव यांचे सुर्यमाला या प्रतिकृतीने प्रथम क्रमांक पटकाविला.

उदघाटन व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे

संचालन डी.व्ही. पुलेनवार व पंकज लेदाडे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रविण ठमके यांनी केले. दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका लक्ष्मीताई दांडेकर यांचे मार्गदर्शनात आर.एम. पेंदाम अधिक्षक, प्रविण ठमके, पंकज लेदाडे, प्रविण खडसे, श्रीमती एस.डी. कनाके, विलास जाधव, वैभव दहिकर ,श्रीमती वि.के.चौधरी, एल.आई. सतपल्लीवार, मनोहर गभणे, दत्तात्रय प्रधान यांनी सहकार्य केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share