WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

के.जी.टू पी.जी. असोसिएशन कडून नृसिंह व्यायाम शाळेला वस्तू स्वरूपात सस्नेह भेट. ..

Image

सागर मुने, वणी

येथील नृसिंह व्यायाम शाळेच्या सभागृहात दिनांक 28 डिसेंबर ला सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाबाराव कुलदिवार, प्रमुख पाहुणे प्रा. अण्णाभाऊ गोरंटीवार, व्ही बी टोंगे, ढोके सर, पांडुरंग ताटेवार,सचिव पुरुषोत्तम आक्केवार, उपाध्यक्ष बाबूलाल पोटदुखे, कोशाध्यक्ष रमेश उगले, संचालक प्रमोदभाऊ इंगोले, नागोराव नलभीमवार, अब्दुल गनी, उपस्थित होते.

यावेळी या सर्वसाधारण सभेत यवतमाळ जिल्हा के जी टू पी जी पेंशनर्स कल्याणकारी असोसिएशन मुख्यालय वणी तर्फे नृसिंह व्यायाम शाळेला 12 ऑफिस खुर्च्या सस्नेह भेट म्हणून देण्यात आल्या. यावेळी संस्थेचे कार्यकारी सचिव श्री पांडुरंगजी ताटेवार यांनी असोसिएशन चे दरवर्षी होणारे अधिवेशन व आरोग्य शिबीर घेण्यास नृसिंह व्यायाम शाळेचे पटांगण आपणास होऊ घातलेल्या कार्यक्रमाला देण्याचे आश्वासन सभेत देण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम आक्केवार यांनी केले तर आभार उपाध्यक्ष बाबूलाल पोटदुखे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी तेसाठी संस्थेचे संचालक मंडळांनी सहकार्य केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share