WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वाघाने अजून १ गाई केली फस्त, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

Image

प्रतिनिधी सचीन मेश्राम मारेगांव यवतमाळ

मार्डी परीसरात मागील आठ दिवासा पासुन वाघाने ३ गाईंवर केले हल्ले तर केगांव येथे एका गाईवर वाघाने हल्ला केला. असुन केगांव येथील रहिवासी सुरेश तुमराम यांच्या गायीवर केगांव जुन्या वस्ती जवळ शेतशिवार लगत हल्ला करुन गायीला ठार केले आणि मार्डी येथील फिक्सकीच्या जंगलात येथील २०डिसेंबर सायंकाळी जंगलातुन घराकडे राखणदार येत असताना गायीवर हल्ला करून विष्णुदास कवडुजी आडे रा.किंन्हाळा यांची गाय ठार केली होती

राखणदार यांना वाघाचे समोरासमोर दर्शन झाले होते. राखणदार त्यांनी आरडाओरड करुन घराकडे पळत जावुन नागरिकांना सागीतले .

तसच २५डिसेंबर रोजी दुपारी २:३०आपटि येथील एक किमी.अंतरावर दत्तु नाना बावणे यांच्या शेतात गाय व वासरालावर हल्ला करुन वासराला व गायीला ठार केले होते ही घटना ताजी असताना आज सुरेश तुमराम यांच्या गायीवर वाघाणे हल्ला करून ठार केले

 - गाईवर हल्ला केल्याची घटना घडत असुन. वनविभागाने वाघाचा बदोंबस करणाची मागणी होत आहे.

परिसरात वाघ असल्याचे नागरिकां कडुन सांगितले जात असुन.

परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

केगांव येथे १गाईंवर, तर आपटी येथे गाईवर व वासराला वर वाघाने हल्ला केला. फिक्सकीच्या शेतकऱ्यांना वाघाचे समोरासमोर दर्शन झाले. त्यानंतर त्यांनी आरडाओरड करत पळ काढला. दरम्यान, तुरीच्या ओळीत बसलेला वाघ तेथून उठला आणि समोर जाऊन गाईवर हल्ला करुन ठार.केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. वन विभागाला वाघ आल्याची माहिती असुन सुद्धा फक्त पंचनामा करुन वाघाचे बदोंबस्त करण्यासाठी दुर्लक्ष करत असल्याने नागरिकां कडुन बोल्या जात आहे कुठेही पिजरे लावले नसल्याने

सध्या कापूसाचा हंगाम जोरात सुरू आहे. त्यातच आज मात्र, वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share