WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

राष्ट्रीय समाज पक्षाचा जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात एल्गार

Image

-अमोल कुमरे

चेतनभाऊ आगलावे यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्ह्यातील वाढत्या अवैध धंद्याविरोधात रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात प्रशासनाला जागे करण्यासाठी, सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी, जिल्हातून दारुबंदी असलेल्या चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यात होणारी अवैध दारुचा पुरवठा, पांढरकवडा मार्गाने होणारी अवैध गुटखा तस्करी व गोवंश तस्करी, वणी, बाभुळगाव, यवतमाळ, पुसद, उमरखेड मध्ये प्रशासनाच्या मदतीने होणारा अवैध रेती साठा, वणी शहरातून होणारी रोजची लाखोंची अवैध दारु पुरवठा, वणी विधानसभा क्षेत्रात प्रशासकीय इमारतीना लागूनच चालणारा दररोजचा लाखोंचा मटका व्यवसाय या सर्व अवैध धंद्याविरोधात राष्ट्रीय समाज पक्ष मा महादेव जानकर साहेबांचा स्वप्नातील समाज घडविण्यासाठी मोठे आंदोलन उभारणार आणि कुंभकर्णीय झोपेतून प्रशासनाला जाग करत या अवैध धंद्यांना आळा घालणार

सदर आंदोलन मा महादेव जानकर साहेबांचा विचाराने

मा बाळासाहेब दोडतले साहेबांचा कणखर नेत्रुत्वात, मा सुभाष राजपूत प्रदेश उपाध्यक्ष रासप यांच्या भुमिकेतून विदर्भ अध्यक्ष चेतनभाऊ आगलावे यांच्या नेत्रुत्वात पूर्णत्वास नेला जाईल

आंदोलनाची दिशा ठरवताना विदर्भ अध्यक्ष चेतनभाऊ आगलावे, यवतमाळ जिल्हा सचिव विरेंद्र चव्हाण, वणी विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर ठाकरे, वणी तालुका अध्यक्ष विजयभाऊ खिरेकर, पुसद तालुका अध्यक्ष सय्यद मजहर, कळंब तालुका अध्यक्ष उत्तम जाधव, महिला जिल्हाध्यक्ष दुर्गाताई वाघाडे, युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष राकेश कुचणकार, वणी शहर अध्यक्ष सुधीर भाऊ झील्पेसह इतर पदाधिकारी उपस्थित होते सकारात्मक समाज बदल घडविण्यासाठी सर्वतोपरी संघर्ष करु असे प्रतिपादन यावेळी चेतनभाऊ आगलावे यांनी केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share