WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विवेकानंद प्राथमिक विद्यालय वणी येथे सुवर्ण महोत्सव व स्नेहसंमेलन सोहळा

Image

-अमोल कुमरे

वणी- शहरातील विवेकानंद प्राथमिक विद्यालयामध्ये 'सुवर्ण महोत्सव व स्नेहसंमेलन' आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या निमित्ताने ‘माजी विद्यार्थी मेळावा’ विशेष आकर्षण असणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा. शंकरराव वऱ्हाटे प्राचार्य शिवरामजी मोघे महा.पांढरकवडा तथा उपाध्यक्ष श्री रामकृष्ण वि.म. वणी तसेच या वणी, आर्णी, चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे विकासपुरुष खासदार मा. सुरेशराव धानोरकर यांच्या हस्ते सुवर्ण महोत्सव उदघाटन होईल त्यानिमित्ताने त्यांची विशेष उपस्थिती आहे.

सांस्कृतिक समितीतर्फे आयोजित केले जाणारे विविध कार्यक्रम हे दरवर्षीच्या वर्षाविहाराचं एक प्रमुख आकर्षण असतं. थंडीच्या लाटेत. सर्वांना निवांत, हलकंफुलकं मनोरंजन मिळावं आणि त्याचबरोबर एक ‘विवेकानंद स्पिरीट’ निर्माण व्हावं हाच त्यामागचा मुख्य उद्देश.

यंदाही त्यासाठी सांस्कृतिक समितीनं जोरदार तयारी केलेली आहे. मात्र त्यादिवशी आयोजित केले जाणारे कार्यक्रम आणि त्यांची माहिती हे सर्व सध्यातरी आम्ही गुलदस्त्यातच ठेवू इच्छितो. उत्सुकतेतून खुमारी वाढवण्याचा हा एक सोपा उपाय, नाही का? फक्त एकच गोष्ट आधी नमूद करायची आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा होतील त्यानंतर विविध प्रकारे नटलेला नाविन्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम असेल, आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करावे असे शाळेतील मुख्यध्यापक विवेकानंद प्राथमिक विद्यालय, वणी यांनी सांगितले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share