WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

परमडोहचे विद्यार्थी जाणार विमानाने दिल्लीला ... आ. बोदकुरवार यांचा पुढाकार...

Image

सागर मुने, वणी

समग्र शिक्षा राष्ट्रीय आविष्कार अभियान उपक्रमाअंतर्गत जी शाळा सर्वात प्रगत झालेली आहे. ज्या शाळेतील विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती सर्वोत्तम आहे. त्यांना प्रोत्साहन व बक्षीस देण्यासाठी त्यांना इतर राज्यातील सर्वोत्तम शाळा व विद्यार्थ्यांना भेटण्याची संधी या उपक्रमाअंतर्गत शासनाने उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमाअंतर्गत वणी तालुक्यातील परमडोह येथील जिल्हा परिषद शाळेचे 10 विद्यार्थी दिल्ली येथे जाणार आहेत.

या प्रगत शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्ली वारी विमानाने घडवून आणण्यासाठी येथील कर्तव्यदक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पुढाकार घेऊन स्वतःच्या खर्चाने या विद्यार्थ्यांना विमानाने दिल्लीला पाठवीत आहेत. आमदारांच्या या पुढाकाराने जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात अतिशय आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

वणी तालुक्यातील जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी येथील गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांच्या नेतृत्वाखाली मोठी शैक्षणिक चळवळ उभी झाली आहे. या शाळातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी नुकतीच राज्याचे माजी शिक्षण प्रधान सचिव नंदकुमार यांनी कार्यशाळा घेऊन नवीन ऊर्जा निर्माण करून दिली. या श्रुखले मध्ये जिल्हा परिषद परमडोह येथील शिक्षक निलेश सपाटे यांनी गुणवत्तेचा ध्यास घेऊन मुलांना घडविण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मदतीने शाळा पूर्ण प्रगत करून आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाच्या पायऱ्या पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत.

या उपक्रमाअंतर्गत इतर राज्यातील शाळा इतर ठिकाणी या मुलांनी भेट दिल्यास विद्यार्थ्यांच्या विचारांची देवाणघेवाण, सांस्कृतिक वृद्धीकरण व आनंददायी शिक्षण प्राप्त करण्यास मदत होईल. व विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात वृद्धी होईल. वणी तालुक्यातील परमडोह येथील वर्ग 6 ते 8चे विद्यार्थी व शिक्षक दिल्लीला जाणार याची माहिती मिळताच आमदारांनी गटशिक्षणाधिकारी याना बोलावून घेऊन त्यांनी वणी तालुक्यात सुरू केलेल्या धडपडीचे कौतुक करून या शाळेतील विद्यार्थ्यांना स्वतःच्या खर्चाने विमानाने पाठविण्याची तयारी दाखवून लगेच विमान तिकिटांचे आरक्षण सुद्धा करून दिले. त्याच्या या कृतीमुळे सर्वत्र आनंद व्यक्त केल्या जात आहे. या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना या शैक्षणिक भेटीसाठी वणी पंचायत समितीच्या सभापती लिशाताई विधाते, उपसभापती संजय पिंपळशेंडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share