WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आंतरराज्यीय हॅकर्स टोळी अखेर जेरबंद, अवधूतवाडी पोलसांना मोठे यश

Image

यवतमाळ- जिल्ह्यातील सायबर एक्सपर्ट बिलावल यांनी मोठी कारवाई यशस्वी पार पाडली. आज काल संगणक युगात सर्व सोपं झालं अशी भाबळी संकल्पना डोक्यात घेऊन काही हॅकर्स टोळी निर्माण झाली आहेत. कुठल्याही गोष्टीची माहिती न मिळवता काहीही करू शकतो म्हणत एका आंतरराज्यीय टोळीने एका व्यक्तीला गंडवण्याचा प्रयत्न केला. चक्क त्याच्या बँक खात्यातून दोन लाख सत्तावन्न हजार तीनशे तीन रुपये आपल्या खात्यात ट्रान्सफर केले.

सूर्या विजय शुक्ला रा.विवेकानंद सोसायटी असे फसगत झालेल्या व्यक्तीचे असून ते पेशाने शिक्षक आहे. त्यांच्याकडे एक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड आहे. पण त्याची माहिती फक्त त्यांनाच आहेअसे असताना सदर शुक्ला यांच्या खात्यातून इतकी मोठी रक्कम ट्रान्सफर झाली अशी तक्रार त्यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात 17 डिसेंबर ला दिली. या गंभीर प्रकाराचे पोलिसांपुढे आव्हान होतेच पण सायबर एक्स्पर्ट सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरेंद्र सिंग बिलावल आणि त्यांच्या टीमने अचूक व्यूहरचना तयार करून अरोपीस अखेर अटक केली.

आरोपी सागर प्रदीप शेट्टी (वय 22) रा. लक्ष्मीनगर, गंल्लामंडी, बॅखिर्डी जहागीरदार,भोपाल मध्यप्रदेश याला व त्याच्या आणखी दोन साथीदारांना रंगेहात पकडले. एपल मोबाईल, लॉपटॉप, सॅमसंग नोट मोबाईल, सॅमसंग ब्लूटूथ व इतर साहित्य अशा 93 हजार 303 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

फ्लिपकार्ट ऑनलाईन खरेदी करणारी टोळीचा पर्दाफाश जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार आणि अप्पर अधीक्षक नरुल हसन, उपविभागीय पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उत्तम कामगिरी पोलीस निरीक्षक अमोल पुरी जमादार नासीर शेख, सायबर सेल दिंगाबर पिलावन आदींनी केली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share