WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी ईसमाचा मृत्यू

Image

मृत्यूदेहाची ओळख अजूनही पटली नाही...!!

शहर प्रतिनिधी/ सचिन मेश्राम (मारेगाव)

मारेगाव वरून तीन किलोमीटरवर असलेल्या वेगाव फाट्या जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी ईसमाचा मृतदेह दोन जानेवारीला रात्री आढळल्याची घटना घडली असुन वृत्त लिहीपर्यत मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

मारेगाव वणी राज्य महामार्गावरील वेगाव फाट्यालगत मोहन ढुमणे यांच्या शेताजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह गस्तीवर असलेल्या पोलिसांना रात्री अडीच ते तीन वाजताच्या सुमारास आढळला असुन मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

दरम्यान घटनास्थळी पोहोचल्यावर रस्त्याच्या बाजूला अंदाजे पन्नास वर्षे वय असलेल्या, डोक्यावर अर्धवट टक्कल, नेव्ही ब्लु रंगाचे कपडे व बनियनवर मोदी, फडणवीस व आमदार बोदकुरवार यांचे फोटो, उजव्या डोळ्यात मोतीबिंदू असे वर्णन असलेल्या इसमाला अज्ञात वाहनाने आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास जबर धडक दिली. यात या व्यक्तीच्या डोक्याला, छातीला, व हातापायाला मोठा मार लागून त्यातच या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केल्या जात आहेत. सदर व्यक्तीची ओळख पटलेली नसून त्याला उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे ठेवला असून या प्रकरणाचा तपास पो. नि. जगदीश मंडलवार यांचे मार्गदर्शनाखाली जमादार आनंद अलचेवार करीत असून अज्ञात वाहनाच्या विरोधात अपराध क्रमांक १/२०२०, कलम २७९, ३०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जर कोणाच्या जवळचा किंवा ओळखीचा असल्यास त्यांनी सम्पर्क करावा असे आवाहनही करण्यात आले .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share