WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

महिलांचा सन्मान करणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी : माया चाटसे यांचे प्रतिपादन

Image

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १८९ वी जयंती साजरी,,,

सागर मुने, वणी

आदर्श प्रशासकीय महाविद्यालय वणी येते ३ जानेवारी ला क्रांतीज्योती, ज्ञानज्योति, महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका,पहिल्या मुखध्यापिका,पहिल्या कवियत्री सावित्रीबाई फुले यांची १८९ वी जयंती साजरी करण्यात आली,

कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक रविंद्र गौरकार प्रमुख पाहुण्या माया चाटसे पी.एस.आय पोलीस निरीक्षक वणी, ऍड, पोर्णिमाताई शिरभाते, प्रकल्प अधिकारी नगरपरिषद ,वणी सौ उज्वला गौरकार, संचालिका, प्राचार्य निशांत खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते.

३जानेवारी हा दिवस महिला मुक्ती दिवस म्हणून देखील साजरा केला जातो, त्याकाळी समाजातील महिला फक्त " चूल आणि मूल " यालाच आपले सर्वस्व मानून जीवन जगत होत्या मात्र सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिबा फुले यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली तेव्हा पासून महिला शिक्षण घेऊ लागल्या व आज महिला डॉक्टर, वकील,शिक्षिका, इंजिनिअर, पत्रकार, राजकिय क्षेत्रात आपला ठसा उमटवित यश संपादन करीत आहे त्यामुळे समाजातील महिलांचा सन्मान करणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी आहे असे मत कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माया चाटसे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा,हर्षदा सातपुते,प्रस्ताविक प्रा,प्रतीक्षा रोहनकर आभार कु, साक्षी जोशी यांनी केले कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share