WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

घोन्सा येथील दुकानाला अचानक आग लागून लाखोचा माल आगीत जळून खाक, गीत घोष यांनी नुकसान भरपाई ची केली मागणी

Image

- प्रतिनिधी अमोल कुमरे ग्रामवासियांची सतर्क्ता इतर हानी होण्यापासून गावला वाचविले

आग लागण्याचे कारण काय? याची शासकीकीय पातळीवर चौकशी करुन दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी. लाखो मला राख झाला असून नुकसान भरपाई अशी अखिल भारतीय संवैधानिक हक्क परिषदेची मागणी केली.

घोन्सा- येथील प्रतिष्ठीत नागरिक व घोन्सा ग्राम पंचायतचे तरुण व सेवाभावी वृत्तीचे उपसरपंच मा.अनिलजी साळवे यांचे घोन्सा तेथील मार्केट लाईनमध्ये मोटरसायकल रिपेरिंग व गाडी पार्ट विक्रिचे दुकान आहे. काल रविवार दि.५ जानेवारी २०२० च्यारात्री अचानक १२ वाजता सुमारास या दुकानाला आग लागली. या दुकानातील विक्रिचे संपुर्ण सामान अंदाजे ६ ते ७ लाखाचे जळून नुकसान झाले आहे.

अनिल साळवे असे दुकादाराचे नाव आहे. ते अत्यंत सेवाभावी वृत्तीचे युवा असुन गावातील कोणत्याही सामाजिक कार्यामध्ये ते अत्यंत उत्साहितपणे व हिररिने पुढाकार घेत असतात ते गावाचे उपसरपंच असल्याने गावातील व सर्व सामान्य लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी धावपळ करुन पुढाकार घेत असतात व लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करित असतात ते अत्यंत करुनामय दानवीर तरुण व्यक्तीमत्व असून त्यांचे सर्वांशी जिवाळ्याचे, प्रेमाचे व बंधुभावाचे संबंध आहे. त्यांनी आपल्या कुटुंबीयांची उदरनिर्वानासाठी हा स्वकष्टाणे व्यवसाय ठाकला होता. अत्यंत प्रतिकुल परिस्थित कष्ट वेचुन हा व्यवसाय त्यांनी अगदी नावारूपात आणून सजविला होता.आज अचानक एका अजानत्या संकटाने हा असा घाला घालुन त्याचे स्वप्न राखेत मिळविण्याचे प्रयत्न झाले आहे व त्यांचेवर आर्थिक संकटाचे डोंगर कोसळले. या घटनेने परिसरातील जनता हळ हळ व्यक्त करीत आहेत.

हा झालेला प्रकार एक घडलेली घटना आहे की, हा घात पात आहे याची शासकीय पातळीवर सखोल चौकसी होऊन यातील सत्य उघडकीस आणावे व लाखो रुपयाचे झालेले नुसकानाची भरपाई अशासकीय पातळीवर करुन मिळावी अशी मागणी अखिल भारतीय संवैधानिक हक्क परिषदेचे राष्ट्रिय अध्यक्ष मा.गीत घोष यांनी आमच्या माध्यमाशी बोलून दाखवली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share