WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

धामणगाव येथे भरदिवसा विद्यार्थिनीची चाकू भोसकून हत्या...आरोपीने स्वतःही संपवन्याचा प्रयत्न केला

Image

आज दि.6 जानेवारी रोजी साडे अकरा वाजता धामणगाव येथे एका माथेफिरू युवकाने बाराव्या वर्गात शिकणाऱ्या विध्यर्थिनी ची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या केली. तर माथेफिरूने स्वतः वर ही वार केले. या घटनेत विद्यार्थिनीचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून माथे फिरू गंभीर जखमी झाला आहे. सध्या गंभीर अवस्थेत तो असून यवतमाळ येथील रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. प्राप्त माहिती नुसार दत्तापुर येथील सागर तितुमरे (वय 25) हा गेल्याकाही महिन्यापासून सिफला विद्यालयात बाराव्या वर्गात शिकणाऱ्या प्रणीता कोंबे 17 हिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. सदर मुलीला तो त्रास देत होता, सतत तिचा पाठलाग करीत होता, त्याच्या जाचाला कंटाळून प्रणीताने या माथेफिरू युवका विरोधात दत्तापुर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. फिर्यादीच्या तक्रारी वरून पोलिसांनी भा. द. वि. 363 नुसार गुन्हा ही दाखल केला होता, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share