WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पत्रकार दिनी पत्रकारांच्या विधवांचा साडी चोळी व आर्थिक मदत देऊन केला सन्मान,,,,,

ImageImageImage

- प्रतिनिधी सागर मुने

आपण सैन्यात शहीद झालेल्या, पोलीस व इतर क्षेत्रातील कार्य करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या पत्नीला सन्मानित करताना पाहिले. ज्या पत्रकारांनी आयुष्य घालवले त्यातच त्यांचा मृत्य झाला, त्यांच्या कुटूंबा कडे कोणाच लक्ष नसते, म्हणून वणी येथे जागृत पत्रकार संघटने तर्फे सन्मान करण्यात आला.

बाळ शास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस असल्याने दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस *‘पत्रकार दिन’* म्हणून साजरा केला जातो. देशाच्या जडणघडणीत पत्रकारांचे योगदान फार मोठे आहे. विविध प्रश्नांवर लेखणी द्वारे आवाज उठवणे, सामाजिक कार्याला प्रसिद्धी देऊन योग्य न्याय देण्याचे काम पत्रकार अखंडितपणे करत असतात. जनतेचा आणि लोकशाही मधील दुवा म्हणून पत्रकारांकडे बघितले जाते. असे मत पाहुण्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमात मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना पत्रकार क्षेत्रात आयुष्य घालवीत अनेक समस्या आपल्या लेखणीने लिखाण करू न्याय देणारे पत्रकार आज ते आपल्यात नाही अशा पत्रकारांच्या कुटुंबाचा सन्मान झाला पाहिजे म्हणून ज्या पत्रकारांनी आपले आयुष्य पत्रकारितेत घालवत त्यांचे जीवन संपले, त्यांची आठवण करत त्यांच्या विधवांना साडी-चोळी व आर्थिक मद देऊन त्यांचा सन्मान करणे अतिशय चांगली संकल्पना आहे असे मत व्यक्त केले. वणीचे पोलीस निरीक्षक वैभव जाधव, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता तुषार परळीकर ,जागृत पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष राजू धवांजेवार यांच्या हस्ते श्रीमती राजश्री गोमकर,व श्रीमती दुर्गाबाई रमेश पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

वणी तालुका जागृत पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप बेसरकर यांच्या संकल्पनेतून हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असून सर्वत्र या उपक्रमाचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे. संचालन दै मातृभूमीचे प्रतिनिधी पुरुषोत्तम नवघरे तर आभार AM न्युज चॅनल चे प्रतिनिधी सागर मुने यांनी केले. यावेळी संघाचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम पोटे, सचिव मोहम्मद मुश्ताक, आकाश दुबे,महादेव दोडके, इकबाल शेख, मुन्ना बोथरा,श्रीकांत किटकुले,गणेश रांगणकर,दीपक छाजेड, विवेक तोटेवार, ज्ञानेश्वर बोनगिरवार, दिवाकर चांदेकर,विशाल ठोंबरे,रवी कोटावार आदी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share