WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

दोन दिवसीय सावित्रीबाई फुले जयंती राजूर कॉ येथे विविध स्पर्धा व कार्यक्रमांनी साजरा.

ImageImageImageImage

■ महिला समारोह समिती व बहुजन स्टुडंट्स फेडरेशन चे वतीने साजरा

______________________

वणी :

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात विविध स्पर्धा व प्रबोधनपर कार्यक्रम महिला समारोह समिती व बहुजन स्टुडंट्स फेडरेशन च्या वतीने राजूर कॉलरी येथील राष्ट्रीय विद्यालयाच्या पटांगणात दि.२ व ३ जानेवारी २०२०ला साजरा करण्यात आले.

दोन दिवसीय झालेल्या या कार्यक्रमात विविध स्पर्धा, रॅली, व्याख्यान, सत्कार,आरोग्य तपासणी असे विविध प्रकाराने साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे हा कार्यक्रम गेल्या २० वर्षांपासून सातत्य टिकवून आहे.

दि.३ जाने ला सकाळी १० वा अभिवादन मिरवणूक राष्ट्रीय विद्यालय ते सावित्रीबाई चौक काढण्यात आली. या मिरवणुकीत शालेय विद्यार्थी, महिला, युवक व गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे अनेक युवतींनी सावित्रीबाईंनी वेशभूषा करून सहभागी झाल्या होत्या.

यानंतर १०:३० वाजता यवतमाळ येथील आरोग्य क्षेत्रात क्रां.सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त डॉ.रानानूर सिद्दीकी यांचे हस्ते रीतसर कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वणी पंचायत समिती माजी उपसभापती वृषालिताई खानझोडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून रामदेवबाबा मूकबधिर विद्यालयाच्या शिक्षिका सरोजताई भंडारी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संगीताताई खटोड, राजूर ग्रामपंचायत सरपंच प्रणित मो.असलम, भांडेवाडा ग्रामपंयायत सरपंच दर्शनाताई मानवटकर, वसुंधराताई गजभिये, दिशाताई पाटील, शिक्षिका जुमनाके मॅडम,सीडाम मॅडम,आवारी मॅडम,भुसारी मॅडम हजर होते.

या उदघाटन समारंभात गावातील ८ अंगणवाडीतील सेविका व मदतनीस म्हणून सेवा करणाऱ्या अशा १६ महिलांचा यांचा सत्कार करण्यात आला.

दि २९ डिसें रोजी घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम बक्षीस यश कांबळे,द्वितीय अक्षय टेकाम, रसिका गावंडे,सुधास तेलंग, तृतीय गौरव गोरघाटे ला देण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षा प्रमुख म्हणून महेश लिपटे सर यांनी जबाबदारी सांभाळली.

दि 2 जाने ला स.१० वाजता चित्ररंग भरा स्पर्धेत प्रथम पुरस्कार आरोही कलपुलवर, द्वितीय प्रयाली डांगरे व तृतीय आरोही भगत यांनी पटकाविले.स.११ वाजता वेशभूषा स्पर्धेत प्रथम बक्षीस ब्राझील पाटील, द्वितीय अर्थ यादव, तृतीय स्वरा चालखुरे त्यानंतर गीत गायन स्पर्धा दु ४ वा घेण्यात आली. या गितगायन स्पर्धेत प्रथम स्थानी अनुराग शेख, द्वितीय ख़ुशी खैरे, तृतीय तन्वी कवाडे,चतुर्थ आकांक्षा जुमळे राहिली. सायंकाळी ७ वाजता बहारदार नृत्य स्पर्धेत प्रथम स्थानी प्रेमा चालखुरे, द्वितीय ब्लॅक डायमंड स्कूल,राजूर , तृतीय प्रज्योत पाझारे यांनी स्पर्धा जिंकली.

दि ३ जाने ला सकाळी रांगोळी स्पर्धेत प्रथम प्रतीक्षा जोगदंडे, द्वितीय प्रणाली तितरे, तृतीय पंधरे हि राहिली. या नंतर लगेच अभिवादन रॅली व १२ वा आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, चर्मरोग तज्ञ,नेत्ररोग तज्ञ व हृदयरोग-मधुमेह तज्ञ डॉक्टरांनी सहभाग घेऊन तपासणी केली.

सायंकाळी सप्तखंजेरीवादक कीर्तनकार विकास चिडे गुरुजी यांचा मनोरंजनातून प्रबोधन,प्रबोधनातून क्रांती असा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.

या नयनदीपक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश लिपटे सर,विक्की जंगले,रक्षा वानखेडे मॅडम,सुनीता,कुंभारे,प्रतिमा दुधे,अश्विनी जंगले,सतीश भडके,प्रणाली पुनवटकर,प्रणिल कांबळे,अंजली रामटेके,अनिकेत डोंदल तसेच महिला समोरोह समिती व बहुजन स्टुडंट्स फेडरेशन,राजूरच्या सर्व पदाधिकारी,सदस्य व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share