WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी येथे मा.सा. दादासाहेब कन्नमवार(माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)120वी जयंती साजरी

Image

प्रतिनिधी: रोहन राजु आदेवार

वणी : येथील कर्मवीर दादासाहेब कन्नमवार चौकात बेलदार समाज बहुउद्देशिय संस्था, वणी तथा युवा शहर कार्यकारिणी वणी यांच्या वतीने दि.10/01/2020 शुक्रवारला सकाळी 9:00 वाजता कर्मवीर दादासाहेब उपाख्य मा.सा.कन्नमवार(माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या 120व्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कर्मवीर दादासाहेब कन्नमवार चौक येथे जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेलदार समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रदीपभाऊ बोनगीरवार तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव पांडुरंगजी ताटेवार सर, न.प. बांधकाम सभापती राकेशभाऊ बुग्गेवार, न.प.सदस्य राजुभाऊ भोंगळे, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी मोहन हरडे सर, संभाजी बिग्रेड शहर अध्यक्ष विवेकभाऊ ठाकरे, वीर भगत सिंग अभ्यासिका संचालक दत्ताभाऊ डोहे, बहुजन स्टूडेंट्स फेडरेशन चे पदाधिकारी प्रवीण भाऊ खानझोडे, संभाजी बिग्रेड जिल्हाध्यक्ष अजयदादा धोबे हे होते. यावेळी अतिथीनी कन्नमवारांच्या पुतळयाचे पूजन व हारार्पण केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष गजानन चंदावार यांनी कन्नमवार यांच्या विषयी सविस्तर माहिती सांगितली. यावेळी सर्व पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या कार्याची व विचारांची आठवण करून दिली.सर्वानी त्यांच्या जीवनचरित्राची प्रेरणा घेऊन कार्य केले पाहिजे असे सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन श्री सागर बरशेट्टीवार यांनी तर आभार श्री विशाल बोरकूटवार यांनी केले. कार्यकमास द्न्यानेश्वर बोनगीरवार, श्रीनिवास एडलावार, दिपक मैदमवार, आनंदराव मुत्यलवार, उमाकांत जामलीवार, राकेश बरशेट्टीवार, राजेश मार्गमवार,अमोल मसेवार, प्रविण येलपुलवार, अमोल बुग्गेवार, सुनिल बोनगीरवार, संदिप मुत्यलवार, आतिष बुरेवार, नंदकिशोर जुब्बेवार, मनोज मसेवार, अमोल गंधेवार, राजू बोईनपल्लीवार, प्रकाश कोंडमवार, रोहन आदेवार, पंकज जुब्बेवार,अविनाश पोचमपल्लीवार, रामदास बलचेवार, राजू दासरवार, रमेश दासरवार, रेखाताई बोनगीरवार , काजल पुरमशेट्टीवार, शिल्पाताई बाचीकवार, चिट्टलवार ताई आदी समाजबांधव, सल्लागार मंडळी, संस्था पदाधिकारी व वणीकर जनता उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share