WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वाघाच्या दोन हल्ल्यात तिन गायी जखमी, वन विभाग कुंभकर्ण अवस्थेत

Image

शहर प्रतिनिधी/ सचिन मेश्राम

मारेगांव- मच्छिन्द्रा बिट अतर्गत बामर्डा गावाच्या शेजारील व डोंगरगांव मार्डी बिट परिसरात पांढरकवडा वाघाचे हल्ले होत आहे. शेतशिवारात लगत घनदाट जंगलात वाघाने बस्तान मांडले आहे. या वाघाच्या हल्ल्यात तिन गायी जखमी झाल्या असून गावात वाघाची दहशत निर्माण झाली. ही घटना शनिवार दुपारच्या सुमारास घडली.

मारेगांव- फिस्की जंगलाअंतर्गत असणाऱ्या बामर्डा, डोंगरगांव व चिंचाळा गावाच्या शेजारील घनदाट जंगलात वाघाने चक्क बस्तान मांडले आहे. या वाघाचे हल्ल्यात तिन गायीवर हल्ला केला असुन बामर्डा येथील रहिवासी नितीन चिकटे यांची गाय मुत्युची झुन देत असुन अजुन पर्यंत वन विभाग अधिकारी व कर्मचारी संबंधित बिट मध्ये गेले नसुन गावात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. ही घटना शनिवार दुपारी च्या सुमारास घडली.

फिस्की जंगलात वाघांनी बस्तान मांडले आहे. या वाघांनी गावाच्या दिशेने मोर्चा वळविण्यास सुरुवात केली आहे. मांगरूड, गौराळा, चिंचाळा, पांढरकवडा मच्छिन्द्रा बामर्डा व इत्यादी गांवा शेजारी लागुन असलेल्या घनदाट जंगल आहे. या जंगलात असणाऱ्या वाघाने गावालगत शेतशिवारात चराईकरिता सोडण्यात आलेल्या गाईवर हल्ले केले. यात तिन गायी जखमी झाल्या असून बामर्दा, चिंचाळा, डोंगरगांव गावातील शेतकरी भाऊराव खंडारे (चिंचाळा) नितीन चिकटे (बमर्दा) व निळकंठ जुमळे (मार्डी) यांचे नुकसान झाले आहे. गावाचे दिशेने वाघ धावत येत असल्याने गावकऱ्याना रात्रीपाळीला जागे राहवे लागत आहे. गांवा शेजारी गायीवर हल्ले होत असुन अजुन पर्यंत वन विभाग कुंभकर्ण झोपेतुन जागे झाले नसल्याने एकदया ग्रामस्थ वर हल्ला झाला तेव्हा जाग येईल का . असे जंगल परिसरात गावे असलेल्या ग्रामस्थ कडुन बोल्या जात आहे. या गायीवर हल्ले झाले त्या शेजारी वाघाचे पंजे दिसून आल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा ढवळ्या गावात नागरिकांनी फिरणे बंद केले आहे.

गावात वन विभागाने कर्मचाºयांकरिता इमारतीचे बांधकाम केले आहे. परंतु इमारत जीर्ण झाल्याने कुणी कर्मचारी यल्ला इमारतीत थांबत नाही. या जंगलात सातत्याने हिंसक प्राण्यांची वाढती संख्या असल्याने शिकारीचे नजरा खिळल्या असून वन विभागाने सावध भूमिका घेण्याची गरज आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share