WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आपला देश पूर्वापार हिंदू राष्ट्र आहे... अशोक घाडगे

Image

सागर मुने, वणी

आपले राष्ट्र हे लाखो वर्षाच्या संस्कारांनी बनलेले आहे. हिंदुत्व ही आपली जीवन पद्धती आहे. या देशाला नव्याने हिंदू राष्ट्र करायचे नाही. हे राष्ट्र पूर्वापार हिंदू राष्ट्र आहे. असे ठाम प्रतिपादन विदर्भ धर्म जागरण समन्वय समिती सदस्य अशोक घाडगे यांनी केले. ते वणी तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघा तर्फे आयोजित राष्ट्र संस्कार संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

येथील एस. बी. लाँ न मध्ये दि.11 जानेवारीला आयोजित राष्ट्र संस्कार संम्मेलनाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते राजीव पामपट्टीवर उपस्थित होते. व्यासपीठावर तालुका संघ चालक हरिहर भागवत उपस्थित होते.

या संमेलनाची सुरुवात पूर्ण गणवेशात शेकडो स्वयंसवेकांच्या पथसंचालनाने झाली. हे पथसंचलन एस. बी. लाँन पासून निघून एल. टी. कॉलेज समोरून टिळक चौक, बस स्थानक, देशमुख वाडी, कणकवाडी मधून पुन्हा एस.बी. लाँन मध्ये आल्यानंतर संमेलनाला सुरुवात झाली. शेकडो स्त्री-पुरुषासमोर बोलतांना अशोकजी पुढे म्हणाले की, या देशातील प्रत्येक व्यक्तीचा डीएनए सारखाच आहे. या देशाची निर्मिती कधी झाली हे नेमकं आपल्याला सांगता येणार नाही. आपण विठ्ठलाच्या आरतीत युगे 28 विटेवरी उभा असे म्हणतो. याचाच अर्थ असा आहे की, हे 28 वे महायुग आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग या चार युगाचा एक महायुग असे आत्तापर्यंत 27 युग होऊन गेले. हे 28 वे युग सुरू आहे. या 28 व्या युगातील सध्या कलियुग सुरू आहे. त्यातील 5121 वे वर्ष सुरू आहे.

या राष्ट्रातील सर्व क्षेत्रात संघ विचार पोहचवून या राष्ट्राला परम वैभवाप्रत न्यायचे आहे. त्यासाठी समाजात असलेली 25 टक्के सकारात्मक जागृत हिंदूंना सक्रिय करून 35 टक्के अक्रियाशील हिंदूंना क्रियाशील होणे ही काळाची गरज आहे. असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केले.

या संमेलनाचे अध्यक्ष राजीव पामपट्टीवर म्हणाले की, या देशाला आपलं म्हणणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. मी जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार करतो तेव्हा मला वाटते की, राष्ट्र प्रेमींचा राष्ट्रासाठी स्वयंस्फूर्तेपणे राष्ट्रहितार्थ असलेला समूह म्हणजे संघ होय अशी संघाची सुटसुटीत व्याख्या केली.

या प्रसंगी प्रास्ताविक संघाचे जिल्हा सहकार्यवाह किरण बुजोने यांनी केले. अमृत वचन सुहास नायगावकर यांनी केले. वैयक्तिक गीत दीपक नवले यांनी सादर केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share