WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

गोवारी गावातील युवक रोजगारापासून वंचित*

Image

आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या मध्यस्थीने काही दिवसात मिळणार युवकांना रोजगार

वणी शहर प्रतिनिधी:- निलेश चौधरी

वणी शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावर असलेल्या, गोवारी गावालगत असलेल्या संद्धभाव प्रा.लि. कंपनी आहे.

लगतच असलेल्या, कोळसा खाणीतील माती,मुरूम, इत्यादी साहित्य उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे कंत्राट संद्धभाव कंपनीने घेतले आहे. या संद्धभाव कंपनीला आवश्यक असलेल्या मजुरांची भर्ती त्यांची आधिच झाली. असल्याने आणि कंपनीचे काम आधिच तोट्यात असल्याने नविन भर्ती घेता येत नसल्याचे, येथील सध्याचे संद्धभाव चे व्यवस्थापक रोहताज यांनी सांगितले. परंतु स्थानिकांच्या रोजगाराचे काय??असा सवाल उपस्थित झाला आहे.

संद्धभाव कंपनीच्या अधिकार्याशी चर्चा केली असता, या आधी असलेली

खेतान प्रा.लि. कंपनीने केलेल्या कामातील नुकसानीचा मोठा प्रभाव, हा संद्धभाव कंपनीवर झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु संद्धभावं कंपनीचा येणार्या नविन गाड्यासाठी लागणार्या कामासाठी, सर्व प्रथम गावातील युवकांचा विचार केले जाईल..!असे सुध्दा यावेळी बोलताना संद्धभाव कंपनीचा रोहताज यांनी सांगितले.

परंतु तरी सुद्धा आंदोलन कर्ते समाधानी न होता.... त्यांनी आमदार बोदकुरवार यांना पाचारण केले.

आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार , सभापतीं संजय पिंपळशेंडे, जि.प.सदस्य बंडू चांदेकर यांनी कंपनीच्या अधिकार्याशी चर्चा करून, स्थानिक युवकांना प्रथम प्राधान्य दिले जावे.

आणि येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गोवारी गावाच्या युवकांना रोजगारा उपलब्ध करून न दिल्यास ,आंदोलन तिव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी संद्धभाव कंपनीला दिला. या आंदोलनाच्या काळात कुठल्याही अनुचित प्रकार घडु नये म्हणून ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासन उपस्थित होते...

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share