WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

न.प. च्या सर्व विदयार्थ्यांना दाखवणार 'तानाजी' चित्रपट....

Image

सागर मुने, वणी

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सारख्या देशभक्त संघटनेच्या मुशीतून तयार झालेले वणी नगर परिषदेचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी पुढाकार घेऊन वणी नगर परिषदेअंतर्गत चालणाऱ्या शाळांमधील सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना स्वराज्य रक्षक सरदार तानाजी वरील चित्रपट स्वखर्चाने चित्रपट गृहात दाखविण्याचे नियोजन केले आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचा सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

एखाद्या चळवळीतून तयार झालेली व्यक्ती जबाबदार पदावर बसली की सकारात्मक खूप कामे होतात याचा प्रत्यय वणी शहरात अनुभवास येऊन राहिले आहे. तारेंद्र बोर्डे नगराध्यक्ष झाल्यानंतर नगर पालिकेत पहिल्यांदा त्यांनी राष्ट्रीय सणांच्या दिवशी भारत माता पूजन सुरू केले. त्यानंतर शहिद वीर जवानांना मानवंदना देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे लहान मुलांवर नकळत चांगले संस्कार होतात ही त्या मागची भूमिका होती. मागील वर्षी रक्षाबंधनाच्या सणा निमित्त नगर परिषदेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सीमेवर या मायभूमीचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांसाठी राख्या तयार करून तत्कालीन गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहिर यांच्या मार्फत नगर परिषदेच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्या सरळ देशाच्या सीमेवर पाठविण्यात आल्या होत्या.

या वेळी मुलाच्या लग्नापेक्षा स्वराज्यावर आलेले संकट आधी हा निश्चय करून ' आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे' असा निर्णय घेणाऱ्या ज्वाज्वल्य देशभक्त तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरील चित्रपट प्रत्येक विद्यार्थ्यांनी पहिला पाहिजे त्याच्या मनात देशाभिमानाचे अंकुर दृढ झाले पाहिजे या उदात्त हेतूने वणी नगर परिषदेचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने दि. 20 जानेवारी ते 22 जानेवारी पर्यंत तीन दिवस विद्यार्थ्यांना निःशुल्कपणे हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांच्या चित्रपट गृहापर्यंत जाण्या येण्याची सुद्धा निःशुल्क व्यवस्था केली आहे. नगर परिषदेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या नियोजनाप्रमाणे शाळेमार्फत हा चित्रपट पाहण्यासाठी पालकांनी पाठवावे असे आवाहन त्यांनी केले आहे. नगराध्यक्षांच्या या उपक्रमाची चर्चा होत असून या उपक्रमाचे वणी शहरामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share