WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी तालुका शिंपी समाज संस्था,सार्वजनिक गणेश उत्सव शताब्दी महोत्सव....

Image

सुरज चाटे वणी:- येत्या गणेशचतुर्थीला देशभरात श्री गणेशाची स्थापना केली जाते, वणी तालुका शिंपी समाज संस्था,वणी या वर्षाला सार्वजनिक गणेशोत्सवाचे १०० वर्षे पूर्ण करीत आहे,याच निमित्याने सार्वजनिक गणेशोत्सव ' शताब्दी महोत्सव २०१८ ' समाजच्या वतीने दिनांक१३ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०१८ पर्यंत साजरा करण्यात येत आहे, यात विविध कार्यक्रम देखील घेण्यात येणार आहे,

दरवर्षी प्रमाणे गणेश उत्सव साजरा करण्यात येत असताना या वर्षाला शिंपी समाज सार्वजनिक गणेशोत्सव सतत व अविरत पणे आपली संस्कृती व परंपरा जपत या वर्षाला १०० वर्षे पूर्ण करीत आहे, या शताब्दी महोत्सव निनित्य विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे दि १३ सप्टेंबर ला साय ६:०० वा श्री गणेशाची स्थापना दि १५ सप्टेंबर सकाळी ९:०० वा वृक्षारोपण प्रमुख उपस्थिती मा, आ, संजीवरेड्डी बोदकुरवार, मा, तारेंद्रजी बोर्डे नगराध्यक्ष न,प,वणी सकाळी १०:०० वा भव्य रक्तदान शिबिर ,उपस्थित मान्यवर संजीवरेड्डी बोदकुरवार, मा, तारेंद्रजी बोर्डे नगराध्यक्ष न,प,वणी मा बाळासाहेब खाडे ठाणेदार वणी मा, डॉ महेंद्रसिंग लोढा,डॉ गणेशजी लिमजे,डॉ सुनीलकुमार जुमनाके यांच्या उपस्थितीत डॉ हेडगेवार रक्तपेढी नागपूर हे रक्त संकलन करणार आहे रात्री ७:०० वा श्री गणेश वंदना स्वर सरिता संतोष गज्जलवार संच चंद्रपुर, दररोज साय ६:०० वा आरती व महाप्रसाद स्थळ कपडा लाईन गांधी वणी दि १६ सप्टेंबर रात्री ६:०० वा फॅन्सी ड्रेस व बुद्धिबळ स्पर्धा यात प्रथम,दुतीय,तृतीय असे पारितोषिक देण्यात येत येणार आहे व सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशिस्तपत्र देण्यात येणार, दि १७ सप्टेंबर ला लोढा हॉस्पिटल,वणी यांचे सौजन्याने सकाळी १० ते १ बी,पी,व शुगर मोफत तपासणी दि १८सप्टेंबर ला साय ७ :०० वा सांस्कृतिक कार्यक्रम दि १९ सप्टेंबर ला मा सुनीलभाऊ कातकडे अध्यक्ष इंदिरा सहकारी सूत गिरणी व व राकेश खुराणा माजी नगराध्यक्ष न,प,वणी यांचे हस्ते कापडी पिशवी वाटप दि २२ सप्टेंबर ला भजन पूजन आणि महाआरती माजी आमदार वामनराव कासावर यांच्या हस्ते नंतर महाप्रसाद दि २३सप्टेंबर ला मा विजयभाऊ चोरडिया अध्यक्ष वर्धमान इंटरनॅशनल स्कुल यांच्या हस्ते महाआरती होणार आहे तसेच दि २४ सप्टेंबर दु ५:०० वा 'डोल ताशांच्या गजरात श्री गणेशाची विसर्जन मिळवणूक गांधी चौक येतून निघणार आहे वरील सर्व कार्यक्रमाला, आरती व महाप्रसाद ला बहूसंख्ये ने उपस्थित राहावे असे आवाहन समस्त शिंपी समाज बांधव वणी याने केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share