WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी यवतमाळ रोडवरील रेल्वे पुलावर उडानपुलं बांधण्यात यावा ! ग्राहक प्रहार संघटना जिल्हा यवतमाळ

Image

प्रसाद नावलेकर

वणी येथील यवतमाळ रोडवर जी रेल्वे रुळाची लाईन गेली आहे ती जागा फारच अरुंद आहे दिवस भरात आठ दहा रेल्वे तेथून येणे जाणे करतात .त्यामुळे प्रत्येक वेळेस 20 ते 25 मिनिट ट्रॅफिक जॅम होतो .जेव्हा गेट उघडतात तिथे फारच अरुंद जागा आहे .छोटे मोठे अपघात ,मारामाऱ्या नेहमीच होतात .गेट उघडल्यावर प्रत्येकाला जाण्याची घाई इतकी असते की त्यामुळे पुन्हा ट्रॅफिक जॅम होतो बरेचदा पोलिसांना पाचारण करावे लागते !

ह्या सर्वांवर एकमेव उपाय म्हणजे उडांन पूल बांधणे हया करीता ग्राहक प्रहार संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांना निवेदन पाठविले असून शासनाने दखल न घेतल्यास रेलरोको करण्याचा निर्धार निवेदनात व्यक्त करण्यात आला असून निवेदनावर ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ राजेंद्र आत्राम,जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर,जिल्हा संघटक बंडूभाऊ लवटे जिल्हा कार्याध्यक्ष दामोध बाजोरीया ,उपाध्यक्ष यशवंत काळे ,कोशाध्यक्ष सुनील धवने सहसचिव भैय्यासाहेब ठमके,,पांढरकवडा तालुका उपाध्यक्षसज्जन सोयम , पाटनबोरी सर्कल प्रमुख जयवंत बावणे,झरी जामनी सर्कल प्रमुख मनोज गेडाम,राळेगाव सर्कल प्रमुख दिलीप वाढई,घाटंजी सर्कल प्रमुख कृतनजय देशपांडे ,आर्णी चे अध्यक्ष शेख सत्तार शेख रज्जाक , मारेगाव सर्कल प्रमुख सचिन मेश्राम ,शिबला सर्कल प्रमुख धनराज तिरमनवार ,राजेंद्र उपलेंचवार प्रदीप भानारकर , सचिन काकडे,

अजय दुमनवार,आदींच्या सह्या आहेत .वरील मागणीला वणी येथील विविध संघटनांचा सुध्दा पाठींबा दिला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share