WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

राष्ट्रीय मतदार दिवस साजरा......वारली चित्रकार शेखर वांढरे यांचा सत्कार

Image

सागर मुने, वणी

मतदान हा आपला हक्क आहे व तो प्रत्येकाने कर्तव्य समजून मतदान केले पाहिजे यासाठी वणी शहरात राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून सर्वत्र विविध कार्यक्रम करून साजरा करतात. त्यानिमित्त शासकीय मैदानातून मतदार जनजागृती पर रॅली काढण्यात आली. यामध्ये शाळा, महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण चे विद्यार्थी, महसूल विभाग, विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. ही रॅली वणी शहरातून काढण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी मतदान करण्यासाठी चौका चौकात पथनाट्य सादर केले.

शासकीय मैदान येथे रॅली संपल्यानंतर मतदान करण्याची शपथ घेण्यात आली व त्यानंतर

पो.हे.कॉ. शेखर वांढरे यांनी 76 वणी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकचे वेळी वारली चीत्रातुन मतदान जनजागृती केल्या बद्दल वणीचे उपविभागीय अधिकारी डाॅ शरद जावळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

पोलीस खात्यात नौकरी करणारे शेखर वांढरे यांनी आपली आवड उत्कृष्ट पणे जपली असून विविध ठिकाणी प्रदर्शनी मध्ये सहभाग घेतात. वारली चित्राद्वारे त्यांनी देश कार्यात महत्वाचे योगदान दिल्याने त्यांचा व एका खऱ्या कलावंतांचा सन्मान करण्यात आल्याने सर्व स्तरातून त्यांच्या कलेचे विशेष कौतुक होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share