WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

प्राध्यापक युवतीला जाळण्याचा प्रयत्न करणारा माथेफिरू पोलिसांच्या जाळ्यात, फास्ट ट्रॅक कोर्टात केश चालविली जाईल गृहमंत्री- अनिल देशमुख

Image

एकतर्फी प्रेमातून ही अमानुष घटना घडल्याची नागरिकात चर्चा, मात्र पोलिसांनी या बाबत कोणताच खुलासा केला नाही.

हिंगणघाट- शहरातील भरसकाळी नंदेरी चौकात एका तरुण शिक्षिकेला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न काल करण्यात आला होता. त्यानंतर मुख्य आरोपी आपल्या अन्य मित्रासह फरार झाला होता. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच शहर पोलीस घटनास्थळी पोहचले. या सध्या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असता, पोलिसांनी आपली तपास यंत्रणा जलद गतीने फिरवून या प्रकरणातील मुख्य आरोपी विक्की नगराळे याला काही तासातच अटक केली. असे सूत्रांनी सांगितले.

या अमानुष घटनेचे पडसाद शहरासह अन्य परिसरात दिसून आले. सदर घटनेचा माध्यमातून नेटकऱ्यांनी जोरदार निषेध केला आहे. हा माथेफेरू तिच्याच गावचा रहिवाशी असून दररोज तरुणीच्या मार्गांवर नेहमी असायचा व तिचा पाठलाग करायचा असे नागरीकातून बोलले जात आहे.

एकतर्फी प्रेमातून ही दुर्दैवी घटना घडू शकते असा अंदाज जनसामान्यातून समजते. परंतु अजून पर्यंत या बाबत काही ठोस कारण कळू शकले नाहीत. सदर तरुणीचा चेहरा पूर्णपणे विद्रुप झाला असून ती अबोल झाली. प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टर सांगतात. या प्रकरणी आरोपीला काय शिक्षा होते याकडे सर्व राज्यातील जनतेचे लक्ष्य वेधले आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share