WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शिवसेनेचा भव्य गजगोटा मोर्चा

Image

सुरज चाटे :- विविध मागण्यांना घेऊन शिवसेना तहसीलवर धडकणार.....

वणी विधानसभा क्षेत्रातील विविध मागण्या घेऊन शिवसेनेचा गजगोटा मोर्चा आज तहसील कार्यालयावर धडकणार असून यात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक महिला व बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

दिनांक 01 आक्टोबर ला शिवसेनेकडून भव्य गजगोटा मोर्च्याचे आयोजन करण्यात आले असून यात शिरपूर, वणी, मरेगाव, झरी, मुकुटंबन, पाठण पोलीस स्टेशन हद्दीतील अवैद्य दारू, मटका जुगार, व्यवसाय त्वरित बंद करावा, शहरी आणि ग्रामीण भागातील महाविद्यालया समोरील गांजा अमली पद्धर्थांची विक्री बंद करावी, गुलाबीबोन्ड अळीमुळे (सन 2018-19) कापसाचे नुकसान भरपाई रु 15000/- सरसकट पेर्यानुसार द्यावी, सोयाबीन पिकावर करपा आल्यामुळे उत्पन्नात जी घट येणार आहे त्याची नुकसान भरपाई रु 10,000/- द्यावी, कोळसा तस्करी बंद करावी, पेट्रोल, डिसल, घरगुती गॅस दरवाढ बंद करावी, शेतकऱयांची संपूर्ण कर्जमुक्ती त्वरित करण्यात यावी, शेतकऱ्याना सिंचनासाठी दिवसा विद्युत पुरवठा द्यावा, चना, तूर नाफेडणे अजूनही पैसे दिले नाही ते द्यावे अशा विविध मागण्याघेऊन मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आज तहसील कार्यालयावर धडकणार आहे.

या मोर्च्याचे नेतृत्व माजी आमदार विश्वास नांदेकर करणार असून यांच्या नेतृत्वात मोरच्या निघणार आहे, हा मोर्चा शासकीय मैदान पाण्याची टाकी येथून दु 2 वाजता निघणार असून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर धडकणार आहे, त्यामुळे या मोर्चात मोठ्या प्रमाणात युवा, व भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे,

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share