WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भारतीय मजदुर संघाच्या 9फेब्रुवारी च्या त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशनात सहभागी व्हा !राष्ट्रव्यापी जनजागरण

Image

भारतीय मजदुर संघाच्या 9फेब्रुवारी च्या त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशनात सहभागी व्हा !राष्ट्रव्यापी जनजागरण कार्यात सहभाग नोंदवा!

गजानन वैद्य जिल्हा अध्यक्ष भारतीय मजदुर संघ

वणी दिनांक 5/2/20 रोजी भारतीय मजदुर संघाची बैठक विश्रामगृह येथे पार पडली .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थाना वरून बोलताना गजानन वैद्य म्हणाले ,येत्या 9 फ्रेब्रुवारी ला यवतमाळ अणे महाविद्यालयात भव्य त्रैवार्षीक भारतीय मजदुर संघाचे अधिवेशन आयोजित करण्यात आले असून भारतीय मजदुर संघ राष्ट्रव्यापी जनजागरण कार्यात सहभागी होऊन त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशनात सहभागी व्हा .विश्वव्यापी व्यापार संघटन ,आंतरराष्ट्रीय मुद्राकोष तसेच विदेशी बहुराष्ट्रीय कंपनी ह्यांचे राष्ट्रविरोधी व आर्थिक हालचाली चा परीणाम उधोग ,कारखाने बंद होत आहे .प्रचंड प्रमाणात बेकारी वाढली आहे ह्या मुळे कामगारात प्रचंड असंतोष वाढला आहे .ह्या करीता हे अधिवेशन बोलावण्यात आले आहे विदर्भातील मान्यवर मार्गदर्शन करणार असून प्रत्येक कामगारांची उपस्थिती आपली शक्ती वाढवणार आहे .असे प्रतिपादन केले ह्या प्रसंगी व्यासपीठावर पांडुरंग सानप जिल्हा सचिव ,देवेंद्र आडे जिल्हा संघटन मंत्री, निरंजन सिंग जिल्हा उपाध्यक्ष ,लक्ष्मण मिश्रा जिल्हा कार्यकारणी सद्स उपस्थित होते .

कार्यक्रमाचे संचालन प्रसाद नावलेकर ह्यांनी केले ,आभार विवेक बदकुले ह्यांनी मानले .

बैठकीला गजानन ठोबरे ,विजय सराफ ,अर्जुन उरकुडे,संजय खडसे,प्रमोद उरकुडे,संजय रिठे,कमलाकर पोटे, जे एन जेनेकर एम एस लुटे,आर सी देशमुख,दिलीप जुंघरे, मंगेश अजमिरे ,आर आर नांपल्लीवर, विनोद ढुमने, गजानन रासेकर प्रामुख्याने उपस्थित होते .वणी तालुक्यातून तीनशे कामगार सहभागी होणार आहेत अशी महिती देवेंद्र आडे जिल्हा संघटन मंत्री ह्यांनी दिली!

आपला

प्रसाद नावलेकर

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share