WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

क्रांती युवा संघटने तर्फे शाळा क्र 1 ला ग्रीन बोर्ड भेट....

Image

सुरज चाटे :- क्रांती युवा संघटने तर्फे दिनांक 3 ला दुपारी 11 वाजताच्या दरम्यान येथील मुलांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करता नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 येथे ग्रीन बोर्ड नसल्याने त्यांना सदर बोर्ड भेट स्वरूपात देण्यात आला.

वणी तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या तसेच विविध जाती धर्मातील, राजकीय आदी क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध युवकांना व पुरुषांना एकत्र करून क्रांती युवा संघटनेची स्थापना करण्यात आली या माध्यमातून विविध कार्यक्रम या ग्रुप मार्फत घेण्यात येत असून दिनांक 3 ला आगळा वेगळा उपक्रम घेत नगर परिषद शाळा क्रमांक 1 येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टीचा विचार करता दिनांक 3 आक्टोबर 2018 रोज बुधवारला दुपारी 11 वाजताच्या दरम्यान शाळेतील मुख्याध्यापक आत्राम सर यांच्या उपस्थितीत, विद्यार्थ्यांचा महत्वाचं ज्यावर विद्यार्थी आपले ज्ञान घेत असते असे ग्रीन बोर्ड (फळा) शाळेला भेट स्वरूपात देण्यात आले, क्रांती युवा संघटना ही सामाजिक कार्य करणारी संघटना असून आपले कार्य सतत सुरू ठेवणार आहे, शाळेला आगळी वेगळी भेट दिल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पहावयास मिळाला असून शाळेने सुद्धा क्रांती युवा संघटनेचे आभार मानले, यावेळी क्रांती युवा संघटने चे सदस्य उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share