WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

धक्कादायक! 23 वर्षीय युवकाची गळाफास घेऊन आत्महत्या, कारण अद्याप कळू शकले नाही

Image

सगणापुर येथील घटना, सुर्यभान मत्ते यांच्या शेतालगत असलेल्या पाकडी झाडाच्या फांदीला गळाफास घेवून जीवन यात्रा संपविले....!!

प्रतिनिधी/ सचिन मेश्राम (मारेगाव)

मारेगांव- तालुक्यातील सगणापुर येथील एका २३वर्षीय युवकांनी गळाफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ११वाजताच्या दरम्यान उघडीस आली मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत मारेगांव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शंकर देवराव खंडरे असे मयत २३वर्षीय युवकाचे नाव आहे शंकर हा खंडरे कुटुंबातील एकुलता एक असल्याने सगणापुर गांवत हळहळ व्यक्त होत आहेत .

दरम्यान, घटनास्थळी मारेगांव पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला असून मारेगांव ग्रामीण रूग्णालयात उत्तरिय तपासणी करता मृत्यूदेह पाठविण्यात आले आहेत. पुढील तपास मारेगांव ठाण्याचे पोलीसचे कर्मचारी करत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share