WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी च्या वतीने अत्याधुनिक प्रयोगशाळांचे उद्घाटन समारंभ

Image

प्रतिनिधी: रोहन राजु आदेवार

वणी: शिक्षक प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी यांच्या वतीने रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र संगणकशास्त्र, इंग्रजी, वाणिज्य, व संशोधन केंद्राच्या नवीन प्रयोगशाळांचा उद्घाटन समारंभ.

समारंभाचे अध्यक्ष माननीय मा.श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार वणी विधानसभा क्षेत्र व माजी विद्यार्थी लो.टि. महाविद्यालय वणी, तर उद्घाटन मा.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य व माजी विद्यार्थी लो.टि महाविद्यालय वणी, आमदार बल्लारशा विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते होणार आहे तर प्रमुख उपस्थिती मा.श्री. अशोकजी उईके माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य व माजी विद्यार्थी लो.टि महाविद्यालय वणी आमदार, राळेगाव विधानसभा क्षेत्र आहे.

शनिवार दि.8 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.00 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या माध्यमातून प्रेम करणाऱ्या समस्त हितकांक्षीना महाविद्यालयातील विद्यार्थी, शहरातील नागरिक व पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन

शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्रजी नगरवाला, उपाध्यक्ष रमेश अणे, सचिव लक्ष्‍मण भेदी, सहसचिव अशोक सोनटक्के संचालक गण दत्तात्रय सुरावार, प्रमोद देशमुख, उमापती कुचनकर, नरेंद्र ठाकरे, रमेश बोरा, नरेंद्र बरडीया, अनिल जयस्वाल, विवेकानंद मांडवकर, डॉ. प्रसाद खानझोडे कार्यकारी प्राचार्य लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share