WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतिने 10 फेब्रुवारीला संपूर्ण विदर्भात रास्तारोको व जेलभरो आंदोलन

Image

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे वेगळ्या विदर्भ राज्याची मागणीची तीव्रता वाढवीत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतिने 10 फेब्रुवारीला संपूर्ण विदर्भात विदर्भातील 11 ही जिल्ह्यात आणि 120 ही तालुक्यात रास्तारोको व जेलभरो आंदोलन होणार आहे त्याचाच एक भाग म्हणून वणी शहरात रस्ता रोको व जेलभरो आंदोलन होणार आहे त्यासाठी दिनांक 7 फेब्रुवारी ला विश्राम गृह वणी येथे मिटिंग घेण्यात आली.

शासन स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा निर्णय घेत नसल्यामुळे विदर्भातील जनतेमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे सरकार कडून नेहमीच विदर्भावर अन्याय होत आलेला आहे त्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समिती कडून 2023 विदर्भ मिशन अंतर्गत ऍक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे याअंतर्गत आंदोलनाची रूपरेषा आखण्यात आली आहे ज्यामध्ये 10 फेब्रुवारी रोजी रास्तारोको व जेलभरो आंदोलन होणार आहे तर 25 फेब्रुवारी नागपूर येथे रेल रोको होणार आहे 1 मे हा काळा दिवस पाळून संपूर्ण विदर्भ बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून मिळाली आहे

त्याचसोबत स्वतंत्र विदर्भ राज्याची त्वरित निर्मिती करा व विदर्भातील जनतेसाठी विजेचे दर निम्मे करा यासाठी 10 फेब्रुवारी वणी येथिल नागपूर रोड च्या पहिल्या टी पॉईंट शिरपूर बाय पास चौकामध्ये होत असलेल्या चक्क जांम आंदोलनात तालुक्यातील जनतेला सहभागी होण्याचे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम पाटील,कोर कमिटी सदस्य रफिक रंगरेज,युवक जिल्हा अध्यक्ष राहुल खारकर,शेतकरी नेते देवराव धांडे,नारायण काकडे,संजय चिंचोळकर,बाळासाहेब राजूरकर दशरथ पाटील,विजयाताई आगबत्तलवार,शालिनीताई रासेकर,यांनी केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share