WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

निलजई परिसरात रविवारी रात्री 8 तर सोमवारी सकाळी तरोडा येथे वाघाचे दर्शन....

Image

वाघ आला रे आला :- तातडीने उपाय करण्याची गरज

सुरज चाटे वणी :- गेल्या काही दिवसात शिरपूर सह परिसरात वाघाची दहशत सुरू असताना आता निलजई कोळसा खान परिसरात तसेच तरोडा येथे वाघ दिसल्याची घटना समोर आली असून सध्या तरी त्या वाघाने कोणताही अनुचित प्रकार केला नसून तो वाघ नरभक्षी होण्या आधी संबंधित विभागाने यावर तातडीने उपाय योजना करून वाघाला जेरबंद करण्याची गरज निर्माण झाली आहे.

वाघ दिसल्याच्या मोठ्या घटना शिरपूर, निलजई, सुंदरनगर, तरोडा, लाठी बेसा, बेलोरा, उकणी, निवली आदी कोळसा खान परिसरात घडत असून अजून पर्यंत या वाघांना पकडण्यात वन विभागाला यश आले नसून हा वाघ अजूनही आपला मुक्त संचार करीत असल्याचे दिसून येत आहे. रविवारी सायंकाळी 8 वाजताच्या दरम्यान निलजई येथील युवकांना कोळसा खान परिसरात वाघाचे दर्शन झाले असून वाघ दिसताच युवकांच्या तोंडून वाच्या बंद झाली होती, त्यातच युवकाने हिम्मत दाखवीत आपल्या मोबाईल च्या कॅमेऱ्यात त्या वाघाला कैद करून खरच वाघ आला असल्याचे जिवंत उदाहरण दाखवले आहे, यावरून तेथील युवकांनी वाघाचा या परिसरात वावर असल्याचे संबंधित वन अधिकाऱ्यांना सांगताच सदर वनअधिकारी सदर परिसरात दाखल झाले त्यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सर्व परिसरातील गावांना व तेथील गावकऱ्याना सतर्कतेचा इशारा देत रात्र पाळीला बाहेर निगताना सांभाळून निघावे आणि सतर्कता बाळगावी असा संदेश देत वाघ त्यादिशेने निघाला होता त्याच दिशेने वन विभागाच्या अधिकाऱ्यानि चौकशी केली त्या ठिकाणाहून वाघाच्या पायाचे ठसे सुद्धा दिसून आले ते सुद्धा त्यांनी घेतले आहे.

या घटने नंतर दुसऱ्या म्हणजे सोमवारला सकाळी 9 वाजताच्या दरम्यान तरोडा येथील युवकांना तरोडा येथे ववाघाचे दर्शन झाले असून हा वाघ त्यापरिसरात सारखा घिरट्या घालत असल्याचे दिसून येत असून वाघाच्या या दहशतीमुळे रात्र पाळीवर जाणाऱ्या शेतकरी शेतमजुरांनी सुद्धा आपले जाणे बंद केले असून केव्हा कोणती अनुचित घटना घडणार हे सांगणे कठीण झाले आहे, त्यातच या मुक्त वाघाच्या संचारावर वन विभाग ठाम निर्णय केव्हा घेणार? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांत पडला आहे, मोठी घटना घडण्या अगोदर या वाघाला जेरबंद करण्याची मागणी जोर धरत आहे.

अफवांना सुद्धा आला पूर......

वाघाची दहशत परिसरात कायम असून या परिसरात अफवांना सुद्धा पेव फुटला आहे त्यामुळे परिसरातील जनतेत तथा शेतकऱ्यां मध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तथा अशा अफवांवर विश्वास ठेवू नये व या वाघावर कायम स्वरूपी तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.

2 वाघ असल्याची चर्चा.....

परिसरात मोठ्या प्रमाणात वाघाची दहशत दिसून येत असून या परिसरात वाघ नेमके आहे किती? असा प्रश्न परिसरातील जनतेत असून याठिकाणी दोन वाघ असल्याचे सुद्धा दबक्या आवाजात बोलल्या जाते, त्यामुळे हे वाघ आक्रमक होण्या आधी संबंधित विभागाने विभागाने यावर उपाय करण्याची गरज आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share