WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शिरपूर गावाला तालुक्याचा दर्जा द्यावा, परिसरातील जनतेची मागणी

Image

•गेल्या 10 वर्षांपासून येथील जनतेची मागणी प्रलंबित....!!

प्रतिनिधी/ शंकर-अमोल (वणी)

वणी- शिरपूर हे गावं वणी कोरपना राज्य मार्गांवर वसलेले आहे. या गावाला ऐतिहासिक गोंडराजे यांचे किल्ले साक्ष आहेत. तसेच याच ठिकाणी शंकराचे पुरातन मंदिर आहे. त्याला 'क' श्रेणी चा दर्जा सुद्धा प्राप्त झाला असून शिरपूर परिसरातील जत्रा प्रसिद्ध आहे. दिनांक 9-8-2012 ला शिरपूरवासी व परिसरातील जवळपास 29 ग्रामपंचायतीचे सरपंच व त्यांचे नाहरकत प्रमाणपत्र असलेला प्रस्ताव विभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात सादर केला होता. पण मात्र, अधिकाऱ्यांनी आजपर्यंत कोणताही पत्र व्यवहार केला नाही. कोणतीही प्रक्रिया केली गेली नाही. अशी खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली आहेत.

ही आपल्यास स्मरण होवो म्हणून पुन्हा शिरपूर व या परिसरातील जनता जनार्दन परत आठवण करून देत. असे त्यांनी या निवेदनाद्वारे म्हटले. शिरपूर हे गावं तहसील करिता असणारे निकष पूर्ण करतात. ते पुढीलप्रमाणे....

पोलीस स्टेशन, महसूल विभाग मंडळाचे केंद्र स्थान, विद्युत कंपनीचे कार्यालय, पोस्ट ऑफिस, जिल्हा मध्यवर्ती बँक, हायस्कुल व जुनिअर कॉलेज, वरिष्ठ प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा, आश्रम शाळा, वरिष्ठ महाविद्यालय, महासेतू, दूरभाष केंद्र, पशुचिकित्सालय श्रेणी, तलाठी मंडळ कार्यलय, आरोग्य केंद्र, आठवडी बाजार, शवविच्छेदन गृह, वाचनालय, कनिष्ठ महाविद्यालय, व्यायाम शाळा, मंडळ अधिकारी कार्यलय, यात्रेचे ठिकाण, निर्गुडा नदी, तलाव, शिरपूर वनश्री पुरस्कार प्राप्त, महात्मा गांधी तंटामुक्ती पुरस्कार अशा विविध सुविधा या शिरपूर गावाला व या क्षेत्राला असताना ही तालूक्याचा दर्जा का दिला जात नाही असाही सवाल येथील जनतेनी केला आहे. शिरपूर तालूका झाला तर येथील जनतेला विकासाच्या दृष्टीने चांगले होईल. गेल्या 10 वर्षा पासून ही मागणी केली जात आहे. असे ही जनतेनी म्हटले. या निवेदनाचा गंभीरपूर्वक विचार करावा जर या निवेदनाचा झाला नाही तर लोकशाही मार्गाचा वापर करत मागणी लागेल.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share