WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मोहदा येथील राहत्या घराला आग, जीवनाश्यक वस्तू जळून खाक

Image

•शासनाने घरकुल व आर्थिक मदत करावी पर्यावरण दक्षता समितीची मागणी...!!

वणी/ कुमार अमोल

वणी तालुक्यातील मोहदा येथील एका राहत्या घराला लागली आग. ही घटना आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास उघडीस आली. किसान जगताप यांच्या घराला ही आग लागल्याचे सूत्रांकडून समजते. या आगीत घरातील अन्न धान्य, पैसे, कपडे, आणि जगण्याचे साधन म्हणजे सुतार काम करण्याची मशीन ही जळून खाक झाल्याची बातमी मिळाली आहे.

प्राप्त माहितीनुसार किसान जगताप हा मुलीला घेऊन चंद्रपूर येथे दवाखान्यात गेला आणि पत्नी कपडे धुण्याकरिता बाहेर गेली असता ही आग लागली असे किसान च्या पत्नीने सांगितले.

नेमकी आग कशाने लागली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र जीवनाश्यक वस्तू आणि उदरनिर्वाह करण्याच्या वस्तू जळल्याने जगताप कुटुंबावर उपास मारीची वेळ आली आहे. यामध्ये एका लाखाचे जवळपास नुकसान झाले. किसान जगताप हा सुतार काम करतो असे गावकऱ्यांकडून सांगण्यात येते. त्यांचा रोजमजुरी करून जगण्याचा नित्यक्रम आहे असे प्रत्यक्षदर्शी ने सांगितले. आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र तोपर्यंत आगीत घरातील संपूर्ण जीवन आवश्यक साहित्य जळून खाक झाले.सदर घटनेची माहिती तलाठी यांना देण्यात आली जगताप दाम्पत्य मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असल्याने शासन तात्काळ आर्थिक मदत जाहीर करून घरकुल मंजूर करावा अशी मागणी कुटुंबियासह पर्यावरण दक्षता समिती मोहदा यांनी केली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share