WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मारेगांव ग्रामीण रुग्णालयाची108 डॉक्‍टरांअभावी रुग्णवाहिका' सेवा ठप्प!

Image

मारेगांव ः महाराष्ट्राची जीवनदायिनी म्हणून नावारूपास आलेली "108 रुग्णवाहिके' टोल फ्री सेवा गेल्या महिनाभरापासून डाँक्टर विणा ठप्प झाली आहे. मारेगांव ग्रामीण रूग्णालयात रुग्णवाहिकांवरील डॉक्टर उपलब्ध नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

महामार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे. अपघातातील जखमी किंवा "इमर्जन्सी'च्यावेळी उपचारासाठी रुग्णवाहिका वणी,पांढरकवडा,मुकुटबण शिरपूर, येतुन रूण्यवाहिका उपलब्ध असली तर रुग्णच्या नातेवाईका दोन ते तिन तास वाट पहावे लागते . मारेगांव तालुक्याला 103खेड्याचा समावेश आहेत मारेगांव तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्र तर एक ग्रामीण रूण्याणाचा समावेश आहेत परंतु, गेल्या महिना- दीड महिन्यांपासून रुग्णांना मारेगांव रुग्णालयात जिल्हा रुग्णालयात रुग्णाना नेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णवाहिकेत डॉक्‍टरांची नियुक्‍ती करण्यात आलेली असते. डॉक्‍टर नसल्याने मागील तिन महिन्या पुर्वी ग्राहक प्रहार संघटनेने उपोषणचा इशारा दिला होता तर 108रुग्णवाहिकेवर डाँक्टर उपलब्ध करून देण्यात आले होते पण मागील दिड महिन्यापासून परिस्थिती जशीच्यातशी निर्माण झाली

डॉक्‍टरांच्या नियुक्‍तीत विलंब होण्याचे कारण ,

राज्य सरकारने रुग्णसेवेसाठी सुरू केलेल्या "108 रुग्णवाहिकेवर बीव्हीजी (भारत विकास ग्रुप) या खासगी कंपनीला ठेका दिला आहे ही कंपनी सेवा देण्यास असमर्थ आहे .

अनेक कारणांमुळे रुग्णवाहिका दुरुस्तीअभावी उभ्या असतात. यात दीड महिन्यांपासून डॉक्‍टर नसल्याने रुग्णवाहिका मारेगांव ग्रामीण रुग्णालया समोर उभी आहे. गरोदर महिला, रस्ते अपघातील जखमी,विविध हल्लयांत जखमी होणे, ह्दयविकार असणारे, आगीत जखमी होणे, विषबाधा ,आत्महत्याग्रस्त अशा अत्यावश्‍यक सेवेसाठी डॉक्‍टर उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असताना याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहेत. 

तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यातील जवळपास प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्‍त आहेत. ही रिक्‍त पदे भरण्याची प्रक्रिया करण्यात आली नाही यात 108 रुग्णवाहिकेतील डॉक्‍टर नसल्याने त्यामुळे मारेगांव तालुकाची शासन दरबारी अपघात मोठ्या प्रमाणात होत असल्याची नोंद असुन सुध्दा मारेगांव तालुक्या कडे आरोग्य विभाचे दुर्लक्ष होत असुन

तालुक्यातून गेलेल्या महामार्गासह रस्ते देखील खड्डेमय झाले आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. असे असताना मारेगांव रुग्णालयाची रुग्णवाहिकेची सेवा "ऑक्‍सिजन'वर असल्याने 108 क्रमांकावर कॉल करून देखील रुग्णवाहिका मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, खासगी रुग्णवाहिका मिळाल्यानंतरच रुग्णाला उपचारासाठी दाखल करता येणे शक्‍य होत आहे. कित्येक रुग्णाचे उपचारा अभावी मृत्यु झालेला आहे .

जनतेचा शासना प्रती आक्रोश वाढत असून ह्याबात ग्राहक प्रहार संघटने तालुका अध्यक्ष सचिन मेश्राम कडे अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत . त्या त्यांनी नुकत्याच ग्राहक प्रहारचे जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर कडे दिल्या असून त्यांनी जिल्हा शल्य चिकिसक मॅडम सोबत संपर्क केला असता मी प्रयत्नरत आहे असे सांगितले पण त्यांचे उत्तराने समाधान न झाल्याने तालुक्यातील 500 बैलगाडी पोलीस स्टेशन समोरील महावर्गावर आणून चक्का जॅम करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जे शेतकरी बांधव ह्यात मार्डी, वेगांव बोटोणी, मारेगांव धामणी, कोलगांव, पिसगांव, करणनवाडी, नरसाळा इत्यादी गांवाचे शेतकरी सहभागी होणार आहे त्यांचे कडून एक फार्म भरन घेण्यात येत आहे .तसेच 1000 बैलांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी पोलीस स्टेशन व ग्रामीण रुग्णालयात करण्या बाबत निवेदन देण्यात येणार आहे ,सर्व काम कायद्याच्या चाकोरीतून करण्यात येत असून तारखेची घोषणा लवकरच करण्यात येईल असे ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सल्लागार प्रमुख तथा माजी तहसीलदार हनुमंतू रजनलवार ह्यांनी कळविले आहे !

"

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share