WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

यवतमाळ ते पुणें ,मुबई प्रवासी विमान वाहतूक सुरू करावी !

Image

केंद्रीय उड्डाणमंत्र पुरी कडे केली ग्राहक प्रहार संघटनेने केली मागणी !

यवतमाळ येथे करोडो रुपये खर्च करून भव्य विमानतळ बांधण्यात आले असून ह्या विमानतळाचा उपयोग केवळ राजकीय व उच्च पदस्थ ह्यांचे करीता करण्यात येत आहे .पुणे ते मुबई करीता यवतमाळ येथुन 24 तासात 90 ट्रॅव्हल जातात जर प्रवासी विमान वाहतूक येथून सुरू केलीतर जनसामान्य लोकांना त्याचा फायदा होईल लोकांचा वेळ वाचेल .ह्या करीता केळापूरचे तहसीलदार सुरेश कव्हळे ह्यांचे मार्फत केंद्रीय उड्डाणमंत्र पुरी ह्यांचे कडे निवेदन पाठवीनेण्यात आले व विमानाची प्रतिकृती भेट देण्यात आली

ह्या मागणीच्या पाठपुराव्या करीता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नामदार बच्चूभाऊ कडू ह्यांना निवेदन पाठविण्यात आले .

ह्या निवेदनावर ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ राजेंद्र आत्राम,जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर,जिल्हा संघटक बंडूभाऊ लवटे जिल्हा कार्याध्यक्ष दामोध बाजोरीया ,उपाध्यक्ष यशवंत काळे ,कोशाध्यक्ष सुनील धवने सहसचिव भैय्यासाहेब ठमके, ,सल्लागार प्रमुख हंमनतु रजनलवार ,राजेंद्र उपलेंचवार,पाटनबोरी सर्कल प्रमुख जयवंत बावणे,झरी जामनी सर्कल प्रमुख मनोज गेडाम,राळेगाव सर्कल प्रमुख दिलीप वाढई,घाटंजी सर्कल प्रमुख कृतनजय देशपांडे ,आर्णी चे अध्यक्ष शेख सत्तार शेख रज्जाक , मारेगाव सर्कल प्रमुख सचिन मेश्राम ,शिबला सर्कल प्रमुख धनराज तिरमनवार ,राजेंद्र उपलेंचवार प्रदीप भानारकर , सचिन काकडे,पंकज नेहारे ,आनंद नक्षणे ,

अजय दुमनवार,आदींच्या सह्या आहेत .वरील मागणीला विविध संघटनांचा सुध्दा पाठींबा दिला आहे व वेळ पडल्यास आंदोलन करण्याची तयारी दर्शविली आहे .

आपला

प्रसाद नावलेकर

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share