WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी शहरात संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी..

ImageImageImage

*"समता व स्त्री-सशक्तीकरनावर भर द्या" -महाराष्ट्राचे प्रख्यात व्याख्यात्या मा.ऍड. वैशालिताई डोळस*

वणी: आद्य समता प्रसारक संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्य संत रविदास जयंती उत्सव आयोजन समिती,वणी तर्फे माजी समाजकल्याण मंत्री मा.बबनराव घोलप व महाराष्ट्राचे प्रख्यात व्याख्यात्या मा.ऍड. वैशालिताई डोळस यांच्या प्रमुख उपस्थितीत,भव्य मिरववणूक,व्याख्यान,विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने जयंती सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.

संत रविदास महाराज यांच्या ६४३ वा जयंती सोहळा संपूर्ण जगात साजरा होत असतो.

*करम बंधन में बंध रहियो,*

*फल की ना ताज्जीया आस कर्म मानुष का धर्म है,*

*सत भाखै रविदास।*

असा कर्म हेच मानवाचे सर्वस्व आहे असे सांगणारे,

समस्त भारताला समतेचा संदेश देणारे संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक प्रबोधन व मार्गदर्शन,विविध सांस्कृतिक कार्यक्रम दिमाखदार सोहळा जल्लोषात संपन्न झाला.दि.१४ फेब्रुवारी २०२० ला सकाळी ७ वाजता संत रविदास सभागृह ते आंबेडकर चौक इथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शनिवार दि. १५ फेब्रुवारी २०२० ला सकाळी ८ वाजता रांगोळी स्पर्धा, सकाळी ९वाजता वंद्यवृंदासह भव्य मिरवणुकीचे वणी शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली.त्यांनतर लगेच सकाळी ११ वाजता उदघाटन समारंभ सुरु झाला,या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी समाजकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य,मा.बाबनराव घोलप, मा.संबा वाघमारे यांच्या हस्ते रितशीर उदघाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकतेत आयोजन समितीचे अध्यक्ष मा.महेश लिपटे सर यांनी जयंती सोहळ्याची रूपरेषा सांगून,संघटनात्मक विचार,युवा मंचचे कार्य विषद केले,तसेच *'समता टिकणारे व स्त्री-सशक्तीकरनावर भर देणारे विचार आत्मसात करून त्याचा प्रसार करावा' असे आवाहन मार्गदर्शक महाराष्ट्राचे प्रख्यात व्याख्यात्या मार्गदर्शक म्हणून मा.ऍड. वैशालिताई डोळस यांनी केले* तर प्रमुख अतिथी म्हणून मा.माधवराव गायकवाड, मा.विश्वनाथजी टिकले, मा.पुनाबाई पिंपळकर,मा.नंदिनी सौंदनकर,मा.माधुरी कळमकर,मा.खोले सर हे मान्यवर उपस्थित होते या दरम्यान चर्मकार समाजातील संघर्षमय परिस्थितीतून आदर्श निर्माण करणारे सौ.लता भटवलकर,श्रीमती खोले,सौ.पद्मा व संभाजी कोरडे आणि ज्योती येरेकर यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनी कुरील,आभारप्रदर्शन दौलत वाघमारे यांनी केले. उदघाटन समारंभानंतर लगेच बहारदार नृत्य,गितगायन,वक्तृत्व असे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले व शेवटी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन बक्षीस वितरण करण्यात आले.

अशा या नेत्रदीपक कार्यक्रमाचा यवतमाळ,चंद्रपूर,वर्धा,नागपूर,नांदेड, अनेक जिल्ह्यातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत रविदास चर्मकार सुधार मंडळ,संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच,संत रविदास जयंती उत्सव आयोजन समिती,वणीच्या सर्व पदाधिकारी,सदस्य,कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share