WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सार्वजनिक रस्ता केला गिळंकृत; प्रौढ दाम्पत्यांचे उपोषण

Image

प्रतिनिधी सचीन मेश्राम मारेगांव*

मारेगांव तालुक्यातील गोधणी येथील. गरिबांना चाळीस वर्षीपुर्वी. शासनाकडुन बेघर देण्यात आले. मात्र एका कुटुंबास मिळलेल्या घरासमोरील सार्वजनिक रस्ताच काटेरी कुंपन करुन गिळंकृत केल्याने पिडीत कुटुंबाना दुसऱ्याचे शेतातून येजा करावे लागत आहेत त्यामुळे सदर कुटुबाच्या जिवितास धोका निर्माण झाल्याने प्रशासनाकडून बेदखल झालेल्या वाढई या प्रौढ दाम्पत्यानी रस्ता मोकळा करण्यासाठी तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले असुन प्रशासन नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

गरिबांना घरे व गावातील सुसज्ज रस्ते हे शासनाचेध्येय धोरण मारेगांव प्रशासनाने वेशीवर टांगले असल्याचे विदारक चित्र आहे. तालुक्यातील गोधणी येथील भालचंद्र वाढई यांना ४० वर्षापूर्वी निवासा करिता बेघर शासना देण्यात आले. सन१९८६मध्ये गोधणी येथे गावठाण पाडून किमान पंधरा कुटुंबाना वास्तव्या करिता बेघर देण्यात आले. जवळपास सर्वांना येजा करण्यास सार्वजनिक रस्त्याची निर्मिती करण्यात आली. वाढई यांचे घरासमोरील सार्वजनिक रस्ता एकाने राजकीय पाठबळामुळे काटेरी कुंपण करून रस्त्याच बंदिस्त करून गिळंकृत केला. याबाबत गेल्या वीस वर्षांपासून हा रस्ता मोकळा करून देण्यासाठी हे कुंटुब प्रशासनाचे दरवाजे ठोठावत आहेत. मात्र नेमके कुठे पाणी मुरत आहेत हे न उलगडणारे कोडे असताना न्याय दुरापास्त झाल्याचे चित्र निर्माण झाले आहेत.

भालचंद्र व जिजाबाई वाढई हे अनुक्रमे ६०व ५५ वर्षाचे दाम्पत्या आपल्या न्यायिक मागणीसाठी आमरण उपोषणाच्या मार्गाने न्याय मागीत आहेत. मागील वीस वर्षांपासून अविरत संघर्ष करणाऱ्या प्रौढ दाम्पत्यास प्रशासनाने आदोलन करण्यास भाग पाडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला होत असतांना आदोलनच्या मार्गाने प्रशासन आता न्याय देतो याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share