WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अडेगाव येथे महारक्तदान शिबीरात 100 लोकांचे रक्तदान

Image

प्रतिनिधी-संघर्ष भगत झरीजामनी

युवा समाजसेवा ग्रुप चे आयोजन

महाशिवरात्री व वैर्याग्यमूर्ती गाडगे महाराज यांच्या जयंतीचा औचित्य साधून दि 23 फरवरी रोजी अडेगाव येथे भोलेनाथ मंदिर येथे भव्य महाप्रसादचे आयोजन केले असता सभोवतालच्या भाविक भक्तांनी हजारोच्या संख्येने या सामाजिक कार्याचा लाभ घेतला.

याचा स्थळी भव्य रक्तदान शिबिरचे आयोजन केले असता या शिबिरामध्ये शेकडो लोकांनी या शिबिराला भेट देऊन निःस्वार्थपने रक्तदान करून आपले रक्त गरजू रुग्णांना उपलब्ध सर्व रक्तदात्याने केले.

या सामाजिक शिबिराचे आयोजन युवा समाजसेवा ग्रुप अडेगाव यांनी केले.

या शिबिरामध्ये एकूण 100 रक्तदात्याने रक्तदान केले असून त्यामध्ये 18 महिला असून 82 पुरुषानि रक्तदान केले. तसेच अडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शैक्षणिक सहलीला जाणाऱ्या 60 विद्यार्थ्यांची निशुल्क रक्तगट तपासणी करून दिली, त्यावेळी सर्व विधार्थयानी युवा समाजसेवा ग्रुप चे धन्यवाद मानले.

शिबिराचे उदघाटन गावातील प्रतिष्ठित नागरिक महादेव पा. पाल,रामदास पाचभाई, मारोती माशीरकार, धनंजय पाचभाई,रामदास घोगले,सुधाकर लालसरे, बबन पारखी यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उदघाटन करून वैर्याग्यमूर्ती गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहारन करून रक्तदान शिबिरला सुरवात झाली.याच सामाजिक कार्याला गुरुदेव मंडळ चे सदस्य हरिदास खोबरे ,संजय उरकुडे तसेच केशव मांढरे,मधुकर परशिवें, रमेश मडावी,वरलु हिवरकर,सौ.विमलबाई टेकाम, ताराबाई हिवरकर,सीमाताई लालसरे,दुर्गा लालसरे,मंदा पाचभाई,संगीता पेटकर,वंदना पेटकर, आदी महिलांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी युवा समाजसेवा ग्रुप चे अध्यक्ष विजय लालसरे,आयोजक मंगेश पाचभाई ,तसेच सर्व सदस्य संतोष पारखी,दत्ता लालसरे,गणेश पेटकर,राकेश किंनेकर,गिरीधर राऊत,सुनील लांडगे,विजय भोयर,विकास निब्रॅड,विलास देठे,प्रणय गोंडे,सुधीर पाचभाई,धनंजय पाचभाई,प्रकाश उमाटे,दिनेश जीवतोडे,प्रयोग पेटकर,सुरज डहाके,राहुल ठाकूर,पिंटू सहस्त्रबुद्धे,दत्ता भोयर,सचिन खमानाकार ,धीरज डहाके,बंडू मांढरे,विकास पारखी,महेंद्र पाल,अनिल आवारी,गणेश बुरडकर,योगेश बेलेकर,सुरज भोयर,प्रदीप भोयर,योगेश परशिवें,निखिल देठे,आदी समाजसेवक उपलब्ध होते तसेच सर्व गावकार्यच्या उपस्थित शिबीर संपन्न झाले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share