WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मिञानेच केला मिञाच्या पत्नीचा विनयभंग,आरोपीला अटक,न्यायालयीन कोठडीत रवानगी

Image

वणी शहर प्रतिनिधी:- निलेश चौधरी

मिञानेच मिञाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना जैताई नगर मध्ये घडली आहे.

येथिल जैताई नगर मध्ये राहण्यार्या एका मिञाने त्याच वार्डात राहणार्या एका मिञाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना दि.22 फेब्रुवारीला सायंकाळी 5:30 वाजताचे दरम्यान घडली आहे.

हरिष पांडुरंग गेडाम(27)रा.जैताई नगर गायकवाड फैल वणी,असे विनयभंग करणार्या आरोपिचे नाव आहे.हरिष आणी त्याचा मिञ एकाच वार्डात राहत असल्यामुळे हरिष अधुन मधुन मिञाच्या घरी जायचा, अशातच त्याची नजर मिञाच्या पत्नीवर पडली.परिणामी दि.22 फेब्रुवारीला सायंकाळी 5:30 वाजताचे सुमारास हरिष मिञाचे घरी गेला.तेव्हा मिञाची पत्नी एकटीच घरी होती.त्याचा फायदा घेवुन त्याने तु खुप आवडते व तुझ्याशी बोलायचे आहे म्हणुन हात धरुन ओढले व मिठी मारली असता ति घाबरुन जोरात ओरडली असता तो घराबाहेर पळुन गेला.त्यानंतर तिने आपल्या पतीला फोन करुन घडलेला प्रकार कथन केला.त्यानंतर थोड्याच वेळात तिचा पती घरी आला व पती पत्नी मिळुन पोलीस स्टेशन गाठुन रितसर तक्रार दाखल केली.या तक्रारीनुसार भादंवी 354(A)452 नुसार गुन्हा दाखल करुन आरोपिस अटक केली.आज दि.23 फेब्रुवारीला वणी न्यायालयात हजर केले असता आरोपिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share