WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रंगारीपुरा येथील राहत्या घरात सिलेंडरचा स्फोट...

Image

जीवीत हानी टळली

वणी शहर प्रतिनिधी:- निलेश चौधरी

रंगारीपुरा येथीला मध्य वस्तीत राहणार्या मध्यम वर्गीय कुटुंब असलेले, उल्हास कृष्णाजी बागळे वय (५३ )याच्या राहत्या घरी दुपारी १: ३० वाजता दरम्यान, सीलेन्डर संपल्यामुळे घर च्या मंडळीनी नेहमी प्रमाणे नवीन सिलेंडर, लावुन गँस चालु करून ,त्यावर पाणी ठेवले. व काही कामानिमित्त बाहेर आले. एवढ्या वेळात ,सिलेंडर चा भयंकर विस्फोट झाला .या मध्ये स्वयंपाकघर, बेडरूम, हाँल स्फोटामध्ये जळुन राख झाले .या मध्ये मौल्यवान सामान टीवी, फ्रीज, आँरोवाटर युनीट, शोकेस, कपडे, व इत्यादी साहित्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहीती हाती आली असुन, अंदाजे चार ते पाच लाँख रूपयांचे आगीत नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share