WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मादी कुत्र्यांच्या पाठीत खूपसला सूरा

Image

प्रतिनिधी-संघर्ष भगत

वरोरा शहरात माणसाला काळीमा फासणारी घटना घडली.एका मादी स्वानच्या पाठीत चाकू खुपसल्याची घटना रविवारी आनंदवन चौक परिसरात घडली.

प्राणिमित्र व अपास एनजीओ सदस्य विशाल मोरे यांना माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन श्वानाच्या पाठीत खुपसलेला चाकू काढण्यात आला. वेदनेने विव्हळत असलेल्या या मादी कुत्राला प्राणीचिकित्सक डॉ. जीवन बारेकर यांना बोलावून प्रथमोपचार करण्यात आले. या स्वान मादीला सहा पिले असून अन्न खाण्याच्या शोधात आनंदवन परिसरातील चिकन व मटण विक्रेत्याच्या दुकानांमध्ये पोट भरण्यासाठी भटकत असते. मागील पाच वर्षापासून आनंदवन चौक येथे अवैधरित्या मास विक्रेत्यांचे दुकाने लागलेले आहेत. त्यामुळे बरेचसे स्वान या परिसरात मास खाण्यासाठी वाट बघत असतात. अशीच घटना आनंदवन चौक परिसरात घडली. रविवारचा बाजार असल्याने मास खरिदाराची खूप गर्दी होती. गिर्‍हाईकाला मास मटन देत असताना त्याची पिशवी खाली पडली. तिथेच मादी स्वान मास खाली पडण्याची वाट पाहत होती. मास खाली पडल्याबरोबर या मादीने मटन पळवण्याचा प्रयत्न केला. मास विक्रेतेला ही बाब लक्षात येतात त्याचा राग अनावर झाला व त्याने जवळच असलेल्या चाकूने मादी कुत्रीच्या पाठीत चाकू खुपसला त्याच परिस्थितीत स्वान मादी मास घेऊन पळाली.

हे घटना परिसरातील प्राणी मित्रांना कळताच मादा स्वानच्या पाठीतील लागून असलेला चार इंच चाकू अपास सदस्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला असून यासंदर्भात प्राणी मित्रांनी स्टेट ऍनिमल वेल्फेअर बोर्ड, नागपूर येथे तक्रार दाखल करण्यात आली.

चिकन विक्रेता या घटनेमुळे दुकान सोडून गेल्याची माहिती मिळाली. मात्र या घटनेमुळेे प्राणिमित्रा मध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली असून हे कृत्य करणाऱ्या मास विक्रेत्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी प्राणीमित्रा तर्फे करण्यासाठी आली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share