WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

बेताल वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापक व प्राचार्य विरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार

Image

आदिवासी समाजाला मुद्दाम बदनाम करण्याचा प्रयत्न...!!

प्रतिनिधी कुमार अमोल

पांढरकवडा- दिंनाक २६ फेब्रु. २०२० रोजी आदिवासी संघटनेच्या वतीने मुकूटबन पोलिस ठाण्यात गजानन महाराज महाविद्यालयात रूजू असलेले प्राचार्य व प्राध्यापकांच्या बेताल वक्तव्य व माथेफिरू विरूध्द तक्रार दाखल करण्यात आली.

आयोजित "समाजशास्त्र" विषयावर कार्यक्रमात प्राचार्य संजय घरटे व प्राध्यापक डॉ. श्रीराम खाडे यांनी कुमारी मातांचे प्रश्न व मुलभूत गरजांच्या पलिकडे या केवळ देहविक्री करूनच सुटू शकतात अशी कुमारी मातेची समज आहे असे बेताल वक्तव्य करून समस्त आदिवासी बांधवाची भावना दुखावल्या व या समाजाला मुद्दामहून बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

यामुळे संपूर्ण आदिवासी बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले असून या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे.

यावेळी जेष्ठ समाजसेवक संभा मडावी, गजानन चांदेकर, अक्षय सिडाम, मारोती सिडाम व अन्य सामाजिक कार्यकर्ते यांनी समाजाविषयी दखल घेऊन तक्रार दाखल केली असून संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना ठणकावून सांगितले व सात दिवसांत घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्यात यावी तसेच प्राचार्य व प्राध्यापक यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा अन्यथा शहरासह राज्यात आंदोलन सुरू करण्यात येईल अशी माहिती आदिवासी समाज संघटनांनी दिली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share