WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

प्राथमिक आरोग्य केंद्र,राजूरला राष्ट्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची शालेय उपक्रम अंतर्गत भेट

Image

राजूर:

राजूर येथील राष्ट्रीय प्राथमिक शाळेच्या वर्ग ४ थी च्या विद्यार्थ्यांनी परिसर अभ्यास विषयातील परिसरातील आरोग्य केंद्राला राष्ट्रीय विज्ञान दिनी भेट देऊन,आरोग्यविषयक माहिती जाणून घेणे,आरोग्य अधिकारी त्यांची मुलाखत घेणे या उपक्रमा अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र ,राजूर ला भेट दिली.

यावेळी वर्ग ४ थीच्या विद्यार्थ्यांनी आरोग्य अधिकारी डॉ.चिखलीकर सर यांची प्रकट मुलाखत घेतली.तसेच औषधीभांडार व वितरण विभाग,शैल्य चिकित्सा विभाग,रक्त तपासणी विभाग,रुग्ण नोंदणी विभाग अशा विविध विभागाला भेटून सविस्तर माहिती घेतली.

या उपक्रमासाठी आरोग्य केंद्राचे डॉ.चिखलीकर सर,श्री.गजभे,श्री.सहारे,श्री.मानतूटे यांनी सर्व विभागाची माहिती दिली.यावेळी शाळेचे वर्ग ४ थी चे विद्यार्थी व मार्गदर्शक मुख्याध्यापक श्री.लिपटे सर,शिक्षक श्री. मोहितकर सर,कु.आवारी मॅडम,श्री.पुरके सर उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share